esakal | जालन्यात सध्या ८८८ कोरोना रुग्णांवर उपचार, नवीन १९२ बाधित

बोलून बातमी शोधा

Jalna Corona Updates }

जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अपुरी पडत असल्याचे चित्र आहे.

जालन्यात सध्या ८८८ कोरोना रुग्णांवर उपचार, नवीन १९२ बाधित
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यात बुधवारी (ता.तीन) तब्बल १९२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एकट्या जालना शहरात तब्बल १०९ बाधितांची भर पडली आहे. दरम्यान, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. १२१ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. परिणामी कोरोनाचा जालना शहरासह जिल्ह्यात उद्रेक सुरूच आहे. बुधवारी (ता.तीन) एक हजार ३९७ नमुन्यांपैकी तब्बल १९२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

वाचा - राजीनाम्यावरुन मुंडे बहीण-भाऊ पुन्हा समोरासमोर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर राजकारण!

यामध्ये जालना शहरात तब्बल १०९ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर तालुक्यातील सावरगाव येथील तीन, अहंकार देऊळगाव, नेर, भाटेपूरी, कारला, वखारी, पिरपिंपळगाव येथील प्रत्येकी एक, मंठा शहरातील एक, तालुक्यातील वाई, तळणी येथील प्रत्येकी एक, परतूर शहरातील एक, घनसावंगी शहरातील एक, तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तीन, भुगेगाव, राजाटाकळी येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील ११, तालुक्यातील भराडी, कवडगाव, जोगेश्‍वरवाडी, महाकाळा येथील प्रत्येकी एक, बदनापूर शहरातील एक, तालुक्यातील सेलगाव येथील चार, चितोडा, कंडारी, अन्वी प्रत्येकी एक, जाफराबाद शहरातील दोन, तालुक्यातील वरूड, टेंभुर्णी येथील प्रत्येकी दोन, किन्होळा, गोंदखेडा, कुंभारझरी, नेमखेडा, माहोरा येथील प्रत्येकी एक, भोकरदन शहरातील तीन, तालुक्यातील आलापूर, लोणगाव येथील दोन, फत्तेपूर, लेहा, बरंजळा लोखंडे, कोडोली, जवखेडा, मोहलाई, चांदई येथील प्रत्येकी एक व बुलडाणा येथील ११, परभणी येथील चार व औरंगाबाद येथील एक असे एकूण १९२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

वाचा - काय सांगता! सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी नवरदेवाची उंटावरून वरात

त्यामुळे आतापर्यंत १५ हजार ८९८ कोरोनाबाधित आढळलेले आहेत. दरम्यान, बुधवारी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ३९८ जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. शिवाय १२१ कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १४ हजार ६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ८८८ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

वाचा - औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा! 24 तासांत 371 जणांना कोरोनाची लागण तर 7 रुग्णांचा मृ्त्यू


अलगीकरण ही झाले सुरू
जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेले संस्थात्मक अलगीकरण आता वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता सुरू करण्यात आले आहे. बुधवारी जालना शहरातील वन प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृहात २४, घनसावंगी येथील अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे सात असे एकूण ३१ जणांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आकडेवारी
एकूण कोरोनाबाधित : १५ हजार ८९८
एकूण कोरोनामुक्त : १४ हजार ६१२
एकूण मृत्यू : ३९८
उपचार सुरू : ८८८

संपादन - गणेश पिटेकर