Coronavirus : जालन्यात कोरोना संसर्गाची साखळी कायम, सहा पॉझिटिव्हची भर

corona image.jpg
corona image.jpg

जालना : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१९) शहरातील विविध आठ भागातील तब्बल २८ व जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील एक अशा २९ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. तर शनिवारी (ता.२०) पुन्हा शहरातील वेगवेगळ्या भागातील सहा व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला.
 अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.


गेल्या महिन्यात ग्रामीण भागात परजिल्ह्यातून परतणाऱ्या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढला होता. त्यानंतर आता शहरात कोरोनाचा संगर्स वाढत आहे. गेल्या आठवडाभरापासून शहरातील विविध विभागात रोज नवे रूग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी आठ भागात २८ रूग्ण आढळल्यांनतर शनिवारी पुन्हा  शहरातील विविध सहा भागातील सहा संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  

यामध्ये देहकरवाडी, नरीमान नगर , रहेमागंज, श्रीकृष्ण नगर, कुरेशी मोहल्ला, रामनगर परिसरातील प्रत्येकी एका रूग्णांचा  समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमिवर व्यापारी महासंघातर्फे शुक्रवारपासून जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी कोरोनाच्या संसर्गाकडे कानाडोळा करणारे जालनावासी तीन दिवसांपासून वाढत असलेल्या रूग्ण संख्येमुळे चितेंत पडले आहेत.

शनिवारी वाढलेल्या सहा रूग्णांमुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या ३५९ झाली असून त्यापैकी २२५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या कोविड हॉस्पीटलमध्ये १२४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर दहा रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

जालना कोरोना मिटर

  • एकुण बाधित ३५३
  • बरे झाले २२५
  • उपचार सुरू १२४
  • मृत्यू १०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com