CORONAVIRUS : जालन्यात कोरोना मीटर सुरुच, आज ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

महेश गायकवाड
रविवार, 28 जून 2020

रविवारी वाढलेल्या ४२ रूग्णांमुळे जालना जिल्ह्याील बाधितांची संख्या ५०४ झाली असून त्यापैकी ३१७ जण बरे झाले आहे. सध्या रूग्णालयात १७४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे

जालना : लॉकडाउन शिथील केल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरविले आहे. गेल्या आठवड्यापासून जालना शहरात सातत्याने कोरोना बाधित रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी (ता.२८)  जिल्ह्यातील ४२ संशयितांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. यात ४० रूग्ण हे जालना शहरातील विविध भागातील असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.  त्यामुळे नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोनापासून बचावासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याने अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

गेल्या आठवड्यापासून जालना शहरातील कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आहे. दोन दिवसात ५५ रूग्ण आढळल्यांनतर रविवारी तब्बल ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. महत्वाची बाब म्हजणे यात सर्वाधिक रूग्ण हे जालना शहरातील आहे. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

या भागातील रुग्णांचा समावेश 
 शहरातील नळगल्ली, संजोग नगर, क्रांती नगर, यशोदानगर, राजश्री शाहुनगर,  योगेश नगर, सुरज अपार्टमेंट व नगर पालिका कार्यालय परिसरातील प्रत्येकी एक, खडकपुरा भागातील पाच, मंगळ बाजारमधील दोन, रहमागंजमधील पंधरा,  दानाबाजार भागातील दहा, जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथील एक व भारज (ता.जाफराबाद) येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.  रविवारी वाढलेल्या ४२ रूग्णांमुळे जालना जिल्ह्याील बाधितांची संख्या ५०४ झाली असून त्यापैकी ३१७ जण बरे झाले आहे. सध्या रूग्णालयात १७४ रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जालना कोरोना मिटर
एकुण बाधित ५०४
बरे झाले ३१७
उपचार सुरू १७४
मृत्यू १३
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna Coronavirus increase 42 corona positive patient