Crime News : जालना हादरलं! गळ्यावर वार करत साडेपाच वर्षाच्या चिमुरडीची हत्या, १४ वर्षाच्या चुलत बहिणीवर संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna crime news 8 year old girl killed at jalana 13 year old girl suspected of crime

Crime News : जालना हादरलं! गळ्यावर वार करत साडेपाच वर्षाच्या चिमुरडीची हत्या, १४ वर्षाच्या चुलत बहिणीवर संशय

जालना : साडेपाच वर्षाच्या बालिकेचा ब्लेडने वार करून खून केल्याची घटना सोमवारी ( ता.२८) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील चौधरीनगरात घडली. हा खून चुलत बहिणीेने केल्याचा संशय असून पोलिसांनी अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले आहे.

मंठा रोडवर असलेल्या चौधरी नगर भागात ईश्वरी रमेश भोसले (वय साडेपाच वर्षे) ही आपल्या काकाकडे शिकण्यासाठी राहत होती. तिचे आई वडील घनसांवगी तालुक्यातील गुंज येथे राहत असल्यामुळे त्यांनी शिक्षणासाठी ईश्वरीला गणेश भोसले यांच्याकडे ठेवले होते. सोमवारी (ता.२८) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चौधरी नगर भागातील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या गणेश यांच्या घरी राहणारी ईश्वर ही अंघोळीसाठी गेली.

याच वेळी तिची चूलत बहिणी ही अंघोळीसाठी गेली. मात्र, बाठरूचा दरवाजा उघडण्यास कोणी तयार नसल्याने मिरा गणेश भालेराव यांनी बाथरूमचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र, दार उघडत नसल्याने शेजारी ही जमा झाले. त्यानंतर मिरा भालेराव यांच्या पंधरा वर्षीय मुलीने बाथरूमचा दरवाजा उघडला. बाथरूममध्ये रक्ताने माखलेली ईश्वरी दिसून आली. तिच्या दोन्ही हातावर आणि गळ्यावर ब्लेडच्या खोलवर जखमा झाल्याचे दिसून आले. शिवाय पंधरा वर्षीय मुलीच्या कपड्यावर ही रक्तासह हाताच्या बोटांवर ही रक्त दिसून आले.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

हेही वाचा: "एका दिशाभ्रम आणि बुद्धीभ्रम झालेल्या…"; राज ठाकरेंच्या राहुल गांधींवरील टीकेला कॉंग्रेसचं प्रत्युत्तर

दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ईश्वरला मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी वाडते यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. शिवाय पोलिसांनी १४ वर्षीय चुलत बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: Udayanraje Bhosale : डोळे पाणावल्यानं उदयनराजे हतबल? खासदारकी सोडण्याबाबत केलं महत्वाचं विधान

आईचं झाली फिर्यादी

स्वतः कडे राहणाऱ्या पुतीनी हत्या झाल्यानंतर मिरा गणेश भा यांनी या प्रकरणी तालुका जालना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही फिर्याद स्वतःच्या मुली विरोधात आईनेचं फिर्याद दिली.

खून केल्यानंतर सांशिताने बाथरूममध्ये पाणी टाकून स्वच्छता केली आहे. तसेच कपडे ही बदल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. मात्र, घरात कपडे बदलल्यानंतर रक्ताने भरलेल्या पायाची ठसे जागोजागी दिसून आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

ईश्वरी जूनमध्ये शाळेत प्रवेश

साडेपाच वर्षीय ईश्वरी हिचा ता. ११ जून २०२२ रोजी शाळेत प्रवेश झाला होता. शाळेत प्रवेश घेताना काका काकूच सोबत होत्या. ईश्वरी ही अत्यंत शांत आणि आज्ञाधारक होती. आधार कार्डनुसार तिची जन्मतारीख ता.१० जून २०१७ असल्याची माहिती स्वरूप इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा तोटे यांनी दिली आहे.

टॅग्स :Jalnacrime