esakal | नियतीच्या मनात वेगळेच होते, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले; अन् 'त्याचे' देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे ! 
sakal

बोलून बातमी शोधा

army.jpg

घराचे नशीब बदलले होते. घरातला तरुण मुलगा मोठ्या मेहनतीने सैन्यदलात भरती झाला होता. चार दिवसावर प्रशिक्षणासाठी जायचे होते. म्हणून त्याने सर्वांची भेट घेणे सुरु केले, बहिणीची पुढील काही दिवस भेट होणार नाही म्हणून तिला भेटायला निघालेल्या युवकाच्या नियतीत काही वेगळेच सुरु होते. वाटेतच काळाने घाला घातला. आणि एसटी- दुचाकीच्या धडकेत तो जाग्यावरच सर्वांना सोडून गेला. ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना भोकरदन तालुक्यात घडली.  

नियतीच्या मनात वेगळेच होते, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले; अन् 'त्याचे' देशसेवेचे स्वप्न राहिले अधुरे ! 

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) :  सैन्य दलात भरती होवून देशसेवा करावी यासाठी त्याने रात्रंदिवस परिश्रम केले. त्याचे फळही भरतीत यशस्वी होवून मिळाले. अवघ्या चार दिवसानंतर प्रशिक्षणाला जायचे म्हणून एकदा बहिणीला भेटून यावे यासाठी तिच्या गावाकडे निघालेल्या भावावर काळाने रस्त्यातच घाला घातला. एसटी-दुचाकीची धडक झाली आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अन त्याचे देशसेवेचे स्वप्न अपूर्णच राहिले. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव  

परसराम पंढरीनाथ चिकटे (वय१९) रा. नांजा (तालुका भोकरदन) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. परसराम याचा बुधवारी (ता.दोन) सिल्लोड-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील खामगाव पाटीजवळ अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. परसराम हा पाच महिन्यांपूर्वीच सैन्य दलाच्या भरती प्रकियेत उत्तीर्ण झाला होता. अन चार दिवसानंतर तो प्रशिक्षणासाठी जाणार होता. त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, शेतजमीन नाही, वडील रिक्षा चालवून मिळालेल्या उत्पन्नातून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यामुळे परसराम हाताला मिळेल ते काम करून वडिलांना घर चालविण्यासाठी हातभार लावायचा. सैन्यात जावे, देशसेवा करावी ही त्याची लहानपणापासून इच्छा होती. त्यामुळे तो मिळेल त्या वेळेत भरतीचा सराव करायचा. 

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन   

अखेर परभणी येथे जानेवारीत झालेल्या भरती प्रक्रियेत तो यशस्वी झाला. मुलाची सैन्य दलात भरती झाल्याने आई, वडिलांसह सर्वजण आनंदी होते. कोरोनामुळे लांबणीवर पडलेले प्रशिक्षण आता सुरू झाल्याने ६ सप्टेंबरला तो प्रशिक्षणासाठी बेळगावला जाणार होता. त्याची तयारीही पूर्ण झाली होती. प्रशिक्षणाला गेल्यानंतर बहिणीची लवकर भेट होणार नाही. म्हणून एकदा तो तिला भेटण्यासाठी बुधवारी सकाळी औरंगाबाद जिल्ह्यातील चौका या गावी दुचाकीने निघाला होता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच सुरू होते. वाटेतच त्याच्या दुचाकीची व एसटी बसची जोरात धडक झाली. या अपघातात परसराम याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाचा आनंद क्षणात दु:खात बदलून गेला. व त्याचे देशसेवेचे स्वप्नही अपूर्ण राहिले.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

उपस्थितांचे डोळे पाणावले !
स्वभावाने अत्यंत मितभाषी असलेल्या परसरामने प्रत्येकाच्या मनात एक वेगळी छबी निर्माण केली होती. सैन्य दलात भरती झाल्याचा गावकऱ्यांनाही त्याचा अभिमान होता. त्याच्या अचानक मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली. बुधवारी दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांबरोबर उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image