Jalna : अवकाळी धारासोबत बरसल्या गारा, शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपर्यंत पाऊस : रब्बी पिकांना फायदा

यादरम्यान शहरातील वीज गुल झाली होती
Jalna news
Jalna newsesakal

जालना : शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता.२६) मध्यरात्रीपर्यंत ठीक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार बेमोसमी पाऊस झाला. यादरम्यान शहरातील वीज गुल झाली होती. तर भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे बेमोसमी पावसासह हलक्या गाराही पडल्या. त्यामुळे शेतकऱ्यांवर ‘अवकाळी धारा...सोबत बरसल्या गारा’ असे म्हणण्याची वेळ आली.

Jalna news
Hair Care Tips: कडुलिंब केसांमधला कोंडा करू शकतं दूर, असा करा वापर

जिल्ह्यात यंदा अल्प पाऊस झाला. त्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्पांनी तळ गाठला आहे. शिवाय पावसाअभावी खरीप हंगामा पाठोपाठ रब्बी हंगामात ही धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर असताना राज्यात काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार रविवारी (ता.२६) रात्री जिल्ह्यात ठीक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. शहरासह परिसरात सुमारे एक तास बेमोसमी पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू होताच शहरातील वीज गुल झाल्याने संपूर्ण शहरात अंधारात बुडाले होते. रात्री उशिरापर्यंत शहरासह जिल्ह्यात अधून मधून बेमोसमी पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान या बेमोसमी पावसाने भर हिवाळ्यात पावसाळ्याचा अनुभव जालनेकरांना मिळाला.

Jalna news
Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

भोकरदन शहरासह तालुक्यात पारध, केदारखेडा, जवखेडा ठोंबरी, हसणाबाद येथे ही विजा कडकडाटासह बेमोसमी पाऊस झालेला. केदारखेडा परिसरात हलक्या गारा ही पडल्या. शिवाय अंबड शहरासह तालुक्यातील सुखापुरी येथे बेमोसमी पाऊस झाला. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवसात २० ते २५ बेमोसमी पाऊस झाला तर रब्बी पिकाला या पावसाचा फायदा होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यात गहु, तूर, ज्वारी, हरभऱ्यासह कपाशीला या बेमोसमी पाऊस लाभदायक ठरू शकतो.

Jalna news
Hair Care Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी 'या' गोष्टीचा करा वापर, केसांना मिळतील फायदे

राजुरला पावसाची हजेरी

राजुर परिसरात रविवारी रात्री ९ वाजता पावसाने विजेच्या कडकडाट, वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला. राजुरला जोरदार पाऊस होवून पाण्याची समस्या मिटावी, असे साकडे शेतकऱ्यांनी वरुणराजाला घातले आहे.

Jalna news
Parenting Tips : वर्षाच्या आतील बाळाला साखर-मीठ का देऊ नये?

पारधला वाऱ्यासह पाऊस

पारध परिसरात रविवारी रात्री पावणे नऊ वाजेपासून विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाळा सुरुवात झाली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार असला, तरीही काही प्रमाणात नुकसान ही होणार आहे. मागील दोन दिवसापासून परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तर दोन दिवसापासून सूर्य दर्शनही झाले नसून, हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. तर पाऊस सुरु होताच नेहमीप्रमाणे विज पुरवठा खंडित झाला असून, रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

Jalna news
Hair Care Tips : तुम्ही केसांना कधी काळे मीठ लावलंय का? नाही तर हा प्रयोग करून बघाच

अंबडला हलक्या सरी

अंबड अंबड शहरासह परिसरात गत दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बद्दल होऊन रविवारी रात्री ढगाळ वातावरणाबरोबरच पावसाच्या हलक्या सरी पडल्या.जिल्ह्यात निर्माण झालेले ढगाळ वातावरण हे अचानक झालेला बदल नाही.

Jalna news
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात सायक्रम निर्माण झाल्याने दरवर्षी दिवाळीनंतर हे वातावरण निर्माण होते. जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवसात २१ ते २५ मिलीमीटर पाऊस झाला तर सर्व रब्बी पिकांना त्याचा फायदा होईल. मात्र, पाऊस न होता हे ढगाळ वातावरण काय राहिले तर रब्बी पिकांवर या विपरीत परिणाम होईल. त्यामुळे पाऊस झालेले पिकांसाठी लाभदायक आहे.

-पंडित वासरे, कृषी अभियंता, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना.

Jalna news
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

भोकरदनला अवकाळी पावसाने झोडपले

भोकरदन शहरासह तालक्यातील काही भागात (ता.२६) रविवारी रात्री विजांचा कडकडाटासह वादळी वारे व अवकाळी पाऊस झाला. विशेष म्हणजे शहर परिसरातील काही भागाला या अवकाळी पावसाने तब्बल एक ते दीड तास झोडपून काढले. कोरड्या दुष्काळाची झळा सोसणाऱ्या भोकरदन तालुक्यातील काही भागाला रविवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची तीव्रता अधिक असल्याने रब्बीच्या गहू, हरभऱ्याचे नुकसान झाले. शिवाय अनेक ठिकाणच्या द्राक्ष, सीताफळ, पेरू आदी फळबागा या अवकाळीने बाधित झाल्या असून, आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे या अवकाळीने नुकसान झाले आहे. हा पाऊस तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, आन्वा, सिपोरा बाजार, बोरगाव जहाँगीर, विरेगाव, फत्तेपूर, केदारखेडा, राजूर, हसनाबाद, मासनपुर, कुंभारी, सोयगाव देवी आदी भागात झाला.

केदारखेडा परिसरात पडल्या गारा

केदारखेडा दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने दिवसात पाणी पडेल, ही आशा होती. परतु संध्याकाळी आठ वाजेपर्यंत स्वच्छ चंद्रदर्शन व कोरडे आभाळ असल्याने पावसाची शक्यता मावळली होती. परंतु, रात्री ९ वाजेनंतर अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह गारा पडण्यास सुरूवात झाली. सुमारे वादळी वा-यासह पाऊण तास पावसाने धुवांधार बँटिग सुरू केल्याने जनावरे पावसात भिजली. त्यानंतर जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. मागील काही महिन्यापासून हवामान अंदाज खोटे ठरत गेल्याने या अंदाजाला ही फारसे शेतकऱ्यांने लक्ष न दिल्याने वीट्टभट्टी, तसेच शेतातील कपाशीचे पूर्णपणे वादळी वाऱ्यासह पावसाने नुकसान झाले. नळणी येथील समर्थ काळू महाराज यात्रेत येणाऱ्या भाविकासह व्यापाऱ्यांची ही या अवकाळी पावसामुळे चांगलीच धांदल उडाल्याचे पहावयास मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com