जालना : लॉकडाऊनमध्ये दुचाकीस्वारांचा फेरफटका, रिक्षाचालकांची चोरीछूपे वाहतूक

jalna lockdown.jpg
jalna lockdown.jpg

जालना : जालना शहरात कोरोनाचे रूग्ण अधिक आहेत. त्यामुळे शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून दुचाकीसह ॲटोरिक्षाच्या फेऱ्या वाढल्याचे चित्र आहे.  त्यामुळे लॉकडाउनच्या शेवटच्या टप्प्यात प्रशासनाला लॉकडाऊन अंमलबजावणीसाठी मरगळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 
जिल्ह्यात आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिका कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर ४२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यात कोरोना बाधित रूग्णांची सर्वाधिक संख्या ही जालना शहरात आहे. त्यामुळे आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस, नगपालिकेचे नगसेवक यांची शहरातील कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठीच्या उपाय योजनेवर बैठक पार पाडली होती.

या बैठकीनंतर शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आले होता. त्यानुसार ता. पाच जुलैच्या रात्री बारा वाजेपासून ते ता. १५ जुलैच्या रात्री बारा वाजेपर्यंत शहरात कडकडीत लॉकडाउन लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. बिनवडे यांनी दिले. या लॉकडाउनमध्ये केवळ वैद्यकीय सेवा वगळता भाजीपाला, किराणा दुकानांसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.


लॉकडाउन लागू झाल्यानंतर सुरवातीचे पाच दिवस शहरात प्रशासनाने कडकडीत लॉकडाउनची अंमलबजावणी केली. मात्र, त्यानंतर लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यास प्रशासनालाच मरगळ आल्याचे चित्र आहे. कारण शहरातील प्रत्येक रस्त्यावर दुचाकीसह ॲटोरिक्षा फिरताना दिसून येत आहे. या लॉकडाउनच्या काळात ही पोलिसांसमोरून अनेक जण एका दुचाकीवर डबल सीट, ट्रीबल सीट प्रवास करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करीत आहेत.

चढ्या दराने भाडे आकारणी

दुसरीकडे चढ्या दराने भाडे आकारून काही आटोरिक्षा चालक भर लॉकडाउनमध्ये शहरात प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान लॉकडाउनचे शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. किमान हे दोन दिसत तरी रस्त्यांवरील दुचाकीस्वारांची रेलचेल प्रशासनाने बंद करणे अपेक्षित आहे. 


(संपादन : प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com