मालेगावहून परतणार जालन्याची राखीव दलाची कंपनी 

उमेश वाघमारे 
Thursday, 7 May 2020

मालेगाव येथे बंदोबस्त कामी जालना राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या गेल्या आहेत. या दोन कंपन्यांमध्ये प्रत्येक ९० जवान आणि तीन अधिकारी आहेत. या दोन कंपन्यांपैकी सी कंपनीही फिक्स पाँईट बंदोबस्त कामी तैनात होती. सी कंपनीच्या ३३ जवानांना कोरोनाची लागण झाली होती.

जालना -  मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेलेले जालना राज्य राखीव पोलिस दलाच्या सी कंपनीतील ३३ जवान कोरोना बाधित झाले, त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, या कंपनीतील ५५ ते ६० जवान आणि अधिकारी मालेगाव बंदोबस्तावरून जालना येथे शुक्रवारी (ता.आठ) सकाळी परतणार आहेत. दरम्यान या जवानांची कोरोनाची तपासणी केल्यानंतर त्यांना १५ दिवसांसाठी भोकरदनच्या शासकीय निवासी शाळा येथे संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 

मालेगाव येथे दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात मालेगाव येथे बंदोबस्त कामी जालना राखीव पोलिस दलाच्या दोन कंपन्या गेल्या आहेत. या दोन कंपन्यांमध्ये प्रत्येक ९० जवान आणि तीन अधिकारी आहेत. या दोन कंपन्यांपैकी सी कंपनीही फिक्स पाँईट बंदोबस्त कामी तैनात होती. सी कंपनीच्या ३३ जवानांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच या कंपनीतील दोन जवान मालेगाव येथून पळून आले होते.

हेही वाचा : पोलिसांच्या सुदृढ आरोग्यासाठी अष्टसूत्री

आता राखीव पोलिस दलाने उर्वरित सर्व जवान आणि अधिकाऱ्यांना जालना येथे परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी सी कंपनीतील सुमारे ५५ ते ६० जवान आणि अधिकारी शुक्रवारी (ता.आठ) जिल्ह्यात दाखल होणार आहेत. त्यांची जिल्हा रूग्णालयामार्फत कोरोनाची तपासणी केली जाणार आहे.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील

त्यानंतर या जवानांना भोकरदन येथील शासकीय निवासी शाळेतील संस्थात्मक अलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. 
दरम्यान, या जवानाची दोन वेळा कोरोना चाचणी होईल. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना पुन्हा १५ दिवस होम क्वारंटाइन केले जाणार असल्याची माहिती राखीव पोलिस दलाकडून देण्यात आली आहे. 

मालेगाव येथे बंदोबस्तासाठी गेलेले राज्य राखीव पोलिस दलाच्या सी कंपनीमधील ५५ ते ६० जवान व अधिकारी शुक्रवारी (ता.आठ) जिल्ह्यात परतणार आहेत. त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना भोकरदन येथे संस्थात्मक अलगिकरण कक्षात ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान कोरोना बाधित ३३ जवानांवर नाशिक येथेच उपचार सुरू राहणार आहेत. 
- गोविंद निजलेवार, 
असिस्टंट,कंमाडंट, राखीव पोलिस दल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna reserve police will return from Malegaon.