Jalna Tragedy: सावंगी तलाव येथे १० वर्षीय साईनाथचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांचा रुग्णालयासाठी आक्रोश

सावंगी तलावात १० वर्षीय साईनाथचा सर्पदंशाने मृत्यू; वेळेवर उपचार न मिळाल्याने ग्रामस्थांत संताप, आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
Emergency Medical Crisis: The Tragic Loss of a 10-Year-Old

Emergency Medical Crisis: The Tragic Loss of a 10-Year-Old

Sakal

Updated on

रामनगर : जालना तालुक्यातील सावंगी तलाव येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असलेल्या एका १० वर्षीय बालकाचा सर्पदंशाने आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साईनाथ सुरेश गिरगुले (वय १० वर्षे) असे मृत बालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण सावंगी तलाव परिसरात आणि गिरगुले कुटुंबावर तीव्र शोककळा पसरली आहे.सावंगी तलाव येथील रहिवासी सुरेश गिरगुले यांचा मुलगा साईनाथ हा शुक्रवारी रात्री आपल्या कुटुंबासह घरात झोपलेला होता.सर्व सदस्य गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास साईनाथला विषारी सर्पाने दंश केला. मात्र, रात्रीच्या वेळी ही बाब तातडीने लक्षात आली नाही आणि नंतर वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळू शकल्याने या निष्पाप बालकाचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com