esakal | जालना शहराने पहिल्यांदा अनुभवली स्‍मशानशांतता
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna News

जिल्हयात अद्यापही एकही कोरोना विषाणूमुळे बाधीत झालेल्या रूगण् आढळुन आलेला नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन  सुरूवातीपासून दक्ष झाले असून, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत.

जालना शहराने पहिल्यांदा अनुभवली स्‍मशानशांतता

sakal_logo
By
महेश गायकवाड

जालना : जालना शहरात रविवारी (ता.22) नागरिकांनी जनता कर्फ्यूचे शंभर टक्के पालन केल्यामुळे अख्ख्या शहराने पहिल्यांदा स्‍मशान शांतता अनुभवली. पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळत देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटात सर्वजण प्रशासन आणि सरकारच्या सोबत असल्याचा संदेश दिला आहे. 

जिल्हयात अद्यापही एकही कोरोना विषाणूमुळे बाधीत झालेल्या रूगण् आढळुन आलेला नाही. मात्र, या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन  सुरूवातीपासून दक्ष झाले असून, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागाच्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना जनता कर्फ्यूचे पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहानाला सकाळपासूनच जनतेने प्रतिसाद दिला.

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

जनता कर्फ्यूचे नागरिकांनी स्‍वतःहून पालन केल्यामुळे  पोलिस प्रशासनाला कोणतेही पाऊल उचलण्याची गरज पडली नाही. शहरातील सर्व रस्‍ते, गल्ली, बाजारपेठात शहरात पहिल्यांदा स्‍मशान शांतता पसरल्याचे पहायला मिळाले. महत्वाची बाब म्हणजे जीवनआवश्‍यक वस्‍तूंची दुकाने, मेडीकलही बंद दिसून आले. पोलिस प्रशासनातर्फे प्रत्येक चौकात पेालिस अधिकारी कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. तसेच शहरातील विविध भागात पेट्रेालिंगही करण्यात येत असल्याचे दिसून आले. 

loading image