Video : कर्फ्यूतले उस्मानाबाद पाहा ड्रोनमधून

तानाजी जाधवर
रविवार, 22 मार्च 2020

शिवाजी चौकामध्ये स्वतः पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातुन होत असलेल्या शुटींगची पाहणी केली. या शिवाय शहरातील विविध भागामध्ये फिरुन सुरक्षा व्यवस्थेची ते पाहणी करत असल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद : शहरामध्ये कोरोनाच्या दहशतीमुळे जनसंचारबंदीला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण निर्माण झाले होते.  प्रशासनाकडून वारंवार घरात बसण्याचे आवाहन केले जात होते. त्याला अनुसरून शहरात शांतता पसरली. सायंकाळीही संचारबंदीसदृश्य परिस्थिती पाहयला मिळाली. स्वतः पोलीस अधिक्षक राजतिलक रोशन रस्त्यावर उतरले असुन सर्वत्र पाहणी करीत असल्याचे चित्र आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन सर्व प्रकारे प्रयत्न होताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन शटडाऊनची हाक प्रशासनाने दिली होती. त्यालाही नागरीकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसुन आले. केंद्र सरकारकडुन पुकारण्यात आलेल्या जनसंचारबंदीलाही प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

शहरातील रस्त्यावर पुर्ण शुकशुकाट पसरला असुन कोणीही नागरीक घराच्या बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा धोका अद्याप शहराला निर्माण झाला नसला तरी, तो होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे घरातून बाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला

नागरिकांमध्येही याबाबत गांभीर्य निर्माण झाल्याने प्रशासनाच्या आवाहनाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने स्त्यांवर शुकशुकाट निर्माण झाला आहे. शहरातील सगळ्याच चौकामध्ये पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असला तरी त्याना अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. 

इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

स्वतः नागरीकच प्रशासनाला मदत करीत असल्याने त्यांच्यावरची अधिकची जबाबदारी कमी झाल्याचे दिसुन येत आहे. या शिवाय पोलीसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातुनही शहरावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे.

शिवाजी चौकामध्ये स्वतः पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी ड्रोन कॅमेराच्या माध्यमातुन होत असलेल्या शुटींगची पाहणी केली. या शिवाय शहरातील विविध भागामध्ये फिरुन सुरक्षा व्यवस्थेची ते पाहणी करत असल्याचे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Janata Curfew In Osmanabad Coronavirus Maharashtra News