लेकरु कोणाचं अन् आनंद कोणाला...

पूर्णा नदीवरील बंधारे आणि माॅडर्न मार्केट या दोन्ही कामांचे श्रेय हे आमदार राजू नवघरे यांचे आहे.
Hingoli News
Hingoli Newsesakal

वसमत (जि.हिंगोली) : पूर्णा नदीवरील बंधारे आणि माॅडर्न मार्केट या दोन्ही कामांचे श्रेय हे आमदार राजू नवघरे यांचे आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित मंत्र्यांना पंचवीस-पंचवीस वेळा भेटले आणि मंजूर करून घेतले. परंतू परभणीचे काही नेते बंधारे आपण मंजूर करून घेतले असे सांगुन पेपरात फोटो छापुन आणत आहेत. लेकरु कोणाचं अन् आनंद कोणाला असं भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष तथा पुर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर (Jayprakash Dandegaonkar) यांनी मंगळवारी (ता.१९) नेत्यांना (Hingoli) टोला लगावताच उपस्थितांमध्ये एकच हस्या पिकला.पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम गव्हाण पूजनाचा कार्यक्रम मंगळवारी दांडेगावकर यांच्या (Vasmat) अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

Hingoli News
अहमदपुरात युवकाच्या मृत्यूने तणाव,आरोपींच्या अटकेनंतर अंत्यविधी

दांडेगावकर म्हणाले, की कारखाना कार्यक्षेत्रात ऊस कधी कमी असतो तर कधी जास्त असतो. मात्र ऊस कमी पडला तेव्हा बाहेरुन आणला आणि जास्त झाला तेव्हा इतर कारखान्यांच्या मदतीने गाळप केला. गेल्या ३८ वर्षांत एक वर्ष सोडले तर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस गाळपाविना उभा राहिला नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू पाटील नवघरे, अंबादासराव भोसले, शिक्षण सभापती महादेव एकलारे, माजी आमदार पंडितराव देशमुख, आदी उपस्थित होते. दांडेगावकर यांनी मार्गदर्शन करताना कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असला तरीही परिसरातील इतर कारखान्यामार्फत अतिरिक्त ऊस गाळप करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सभासदांनी बीएसआय, पुणे यांच्याकडून ऊसाची रोपे घेण्यासाठी कारखान्याकडे नावे नोंदवावी. नवीन जातीमुळे ऊस उत्पादनात वाढ होणार आहे. प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून भाजीपाल्यावर प्रक्रिया करून त्यांची पॅकिंग व तो बाहेर देशात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com