अहमदपुरात युवकाच्या मृत्यूने तणाव,आरोपींच्या अटकेनंतर अंत्यविधी

ही घटना शारीरिक व मानसिक त्रास देत घातपातातून घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
latur news
latur newsesakal

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील टेंभुर्णी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह मंगळवारी (ता.१९) गावातील विहिरीत आढळला. ही घटना शारीरिक व मानसिक त्रास देत घातपातातून घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. टेंभुर्णी येथील जेसीबी चालक कोंडीबा श्रीपती कासले (वय १९) याचे गावातील एका मुलीसोबत प्रेम संबध होते. यातून या पुर्वी दोन्ही कुटुंबात (Crime In Latur) दोन वेळा वाद झाला होता. कोंडीबा कासले १६ ऑक्टोबर रोजी घराबाहेरील शेडमधे एकटेच झोपले होते. दरम्यान कोंडीबाचा भाऊ रात्री एक वाजता घरी आला असता कोंडीबा झोपलेल्या ठिकाणी फक्त चप्पल व मोबाईल आढळून आल्याने त्यांनी घरात झोपलेल्या माणसांना ही माहिती दिली. या प्रकरणी १७ ऑक्टोबर रोजी कोडिंबाच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार अहमदपूर पोलिस ठाण्यात (Ahmedpur)दिली. दरम्यान मंगळवारी (ता.१९) कोंडीबाचा मृतदेह टेंभुर्णी शिवारातील विहिरीत (Latur) आढळून आला. कोंडीबाच्या नातेवाईकांनी संशयित  आरोपी अटक झाल्याशिवाय अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका घेत मृतदेह ग्रामीण रूग्णालयासमोर वाहनात ठेवला.

latur news
पिकविमा कंपनीचा असहकार! अर्ज फेकली शेतात, शेतकऱ्यांचा संताप

या प्रकरणी मृताची आई शशीकला कासले यांच्या फिर्यादीवरून देवानंद मनोहर गायकवाड, सुहास खंडेराव गायकवाड, एकनाथ निवृत्ती गायकवाड सर्व (रा.टेंभुर्णी.ता.अहमदपूर) अक्षय जळबा गायकवाड (रा.मोहिजा परंडा, ता.कंधार) विश्वंभर गणपती मसुरे, मुलीचा मावस भाऊ (रा.हाळी ता.उदगीर) यांच्या विरोधात अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तीन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

गावी अंत्यसंस्कार

युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी विरोधात गुन्हा नोंद व आरोपींना अटक होईपर्यंत शवविच्छेदन व अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. गुन्हा नोंद व आरोपींना अटक झाल्यावर मृतदेह गावी नेऊन अंत्यविधी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com