esakal | सराफा व्यापाऱ्याला लुटले ? फिर्याद देण्यास मात्र नकार
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : तालुक्यातील  निधोना रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून भरदिवसा सोने लुटल्याची चर्चा मंगळवारी (ता.१४) शहरात सुरू होती.

सराफा व्यापाऱ्याला लुटले ? फिर्याद देण्यास मात्र नकार

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : तालुक्यातील (Jalna) निधोना रोडवर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून भरदिवसा सोने लुटल्याची चर्चा मंगळवारी (ता.१४) शहरात सुरू होती. त्यानंतर चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आलेल्या सराफा व्यापाऱ्याने (Crime In Jalna) फिर्याद देण्यास नकार देत, नंतर बघू असे म्हणून पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतल्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी सांगितले. त्यामुळे लुटमारी झाली की लुटमारीचा बनाव झाला असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. शहरातील विजय सुवर्णकार या सराफा व्यापाऱ्याचे उज्जैनपुरी येथील सोन्याचे दुकन आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

मंगळवारी दुपारीच्या वेळेत निधोना रोडवर दुचाकीवरून जाताना मिरचीची पुड डोळ्यात टाकून व दोन्ही हातवर ब्लेडने वार करून त्याच्या जवळील बॅगमधील तब्बल दहा तोळे सोने दरोडेखोरांनी लुटल्याची चर्चा सुरू होती. याच दरम्यान चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच चोरट्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला. मात्र, या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आलेल्या विजय सुवर्णकार यांनी घुमजाव करत फिर्याद न देताना मंगळवारी रात्री चंदनझिरा पोलिस ठाण्यात काढता पाय घेतल्याचे पोलिस निरीक्षक देविदास शेळके यांनी सांगितले. त्यामुळे चोरट्यांनी घर सोने लुटले की लुटमारीचा बनाव करण्यात आला अशी चर्चा आता शहरात सुरू आहे.

loading image
go to top