चाकूरच्या नगराध्यक्षपदी माकणे, बच्चू कडूंनी भाजपच्या मदतीने केला 'आघाडी'चा पराभव | Bacchu Kadu And Chakur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bacchu Kadu And Chakur Municipal Council

चाकूरच्या नगराध्यक्षपदी माकणे, बच्चू कडूंनी भाजपच्या मदतीने केला 'आघाडी'चा पराभव

चाकूर (जि.लातूर) : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कपिल माकणे व उपनगराध्यक्षपदी भाजपचे अरविंद बिराजदार यांची निवड झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे सहा, महाविकास आघाडीचे आठ व भाजपचे तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. बुधवारी (ता.नऊ) अध्यासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडी करण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) करीम गुळवे यांना आठ व प्रहार जनशक्ती पक्षाचे कपिल माकणे यांना नऊ मते पडली. तर उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे भागवत फुले यांना (Latur) आठ व भाजपचे अरविंद बिराजदार यांना नऊ मते पडली.(Kapil Makane Elected As President Of Chakur Municipal Council, Bacchu Kadu Defeated Mahavikas Aghadi)

हेही वाचा: EDची कारवाई आताच होते का, रावसाहेब दानवेंचा राऊतांना टोला

नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा उपविभागीय अधिकारी श्री. फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या राज्यमंत्री बच्चु कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) मराठवाड्यात पहिल्या नगरपंचायतीमध्ये भाजपच्या सहकार्यातून पक्षाचा झेंडा फडकावला आहे. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, दिलीपराव देशमुख, रामचंद्र तिरूके, विठ्ठलराव माकणे, बालाजी पाटील, गोविंदराव माकणे प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले यांनीही नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षांचा (Chakur) सत्कार केला.

Web Title: Kapil Makane Elected As President Of Chakur Municipal Council Bacchu Kadu Defeated Mahavikas Aghadi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top