दिलासादायक : केसरजवळग्यातील कुटुंब झाले कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. सुरवातीला मावशी त्यानंतर अकरावर्षीय मुलगा, आजीबाई आणि शेवटी १३ वर्षांचा मुलगा अशा चौघांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. एकामागून एक करीत चौघांनीही उपचारानंतर कोरोनाला हरवले असून, चारही जण कोरोनामुक्त झाली आहे. 

केसरजवळगा (उस्मानाबाद) : मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. सुरवातीला मावशी त्यानंतर अकरावर्षीय मुलगा, आजीबाई आणि शेवटी १३ वर्षांचा मुलगा अशा चौघांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. एकामागून एक करीत चौघांनीही उपचारानंतर कोरोनाला हरवले असून, चारही जण कोरोनामुक्त झाल्याने कुटुंबासह संपूर्ण गावाला दिलासा मिळाला आहे. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

कामानिमित्त शहरी भागात असलेले अनेक कामगार व कष्टकरी मजूर कोरोना आणि लॉकडाउनमुळे आपल्या गावाकडे परतत आहेत. शुक्रवारपर्यंत (ता. ११) परजिल्ह्यातून गावात ६०२ नागरिक गावात दाखल झाले आहेत. यात २५ जणांना शाळेत संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर शेतात १० आणि घरात १८ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
केसरजवळगा येथे (२० मे) मुंबईहून सकाळी एक कुटुंब खासगी वाहनाने कर्नाटकमार्गे गावात आले होते. यात दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश होता. या सर्वांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. सुरवातीला यातील ३७ वर्षीय महिलेला दुसऱ्या दिवशी अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिकेने उपचारासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने २२ मे रोजी या महिलेचे स्वब तपासणीला प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. 

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

 

२४ मे रोजी रात्री अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले. यानंतर संपूर्ण परिसर सील करून आरोग्य विभागाने दोनशे मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला. बाधित महिलेच्या संपर्कातील महिलेच्या ६० वर्षीय आईसह बहिणीच्या दोन मुलांनाही ताब्यात घेत या तिघांना मुरूमच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तिघांचेही स्वब तपासणीसाठी २५ मे रोजी पाठविण्यात आले होते. यात अकरावर्षीय मुलाचा अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्याला पुढील उपचारासाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर ६० वर्षीय महिला आणि तेरावर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णीत राहिला. 

उस्मानाबादेत गर्भवती महिलेला कोरोनाची लागण   

त्यामुळे पुन्हा या दोघांचे स्वब तपासणीला पाठविण्यात आले यात आजीबाईंचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला होता; मात्र त्याला ताप येत असल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयातच उपचार सुरू ठेवले होते. ताप कमी होत नसल्यामुळे पुन्हा स्वब तपासणीला प्रयोगशाळेत सोमवारी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी ता. तीन जून रोजी रात्री प्राप्त झाला. यात तेरा वर्षांच्या मुलालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. एकाच कुटुंबातील चौघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. यात सुरवातीला आढळलेली ३७ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली. यानंतर एक अकरावर्षीय मुलगा, ६० वर्षांची आई आणि बहिणीच्या दुसऱ्या तेरावर्षीय मुलाने बुधवारी ता. १० रोजी कोरोनाला हरवले आहे. एकाच कुटुंबातील सर्वांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केल्याने कुटुंबासह नातेवाइकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. या सर्वांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. यानंतर गावात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याने ग्रामस्थांनाही दिलासा मिळाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kesarjavulka Family  became Corona Free