esakal | खंडेश्वरी प्रकल्पाला भेगा; उंडेगावातून होतेय स्थलांतर 
sakal

बोलून बातमी शोधा

kashid.jpg

सांडवा फोडल्यामुळे नळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. उंडेगावच्या मधून नदी वाहत असल्याने गावातील नागरिकांनी स्थलांतर केले असून, गाव मोकळे करण्यात आले आहे.

खंडेश्वरी प्रकल्पाला भेगा; उंडेगावातून होतेय स्थलांतर 

sakal_logo
By
प्रकाश काशिद

परंडा (उस्मानाबाद) : तालुक्यातील खंडेश्वरवाडी प्रकल्पाच्या भरावाला मोठी भेग पडली असून, भरावाची बाजू खचू लागल्याने सुरक्षेसाठी परिसरातील नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उंडेगाव व परिसरातील अनेक नागरिकांनी स्थलांतर केले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे खंडेश्वरवाडीचा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’ झाला होता. सोमवारी (ता.२८) प्रकल्पाच्या भरावास मोठी भेग पडल्याचे व ती वाढत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रशासनास माहिती दिली. मंगळवारी (ता. २९) धोका टाळण्यासाठी प्रकल्पाचा सांडवा फोडण्यात येऊन पाणी सोडून देण्यात आले. त्यामुळे नळी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सांडवा फोडल्यामुळे नळी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. उंडेगावच्या मधून नदी वाहत असल्याने गावातील नागरिकांनी स्थलांतर केले असून, गाव मोकळे करण्यात आले आहे. तसेच चिंचपूर, वाटेफळ, ताकमोडवाडी, पारेवाडी या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे. आमदार प्रा. तानाजीराव सावंत यांनी प्रकल्पावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला तर अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना दिल्या. तहसीलदार अनिलकुमार हेळकर, उपअभियंता सुनील पवार, शाखा अभियंता पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीडचे अधीक्षक अभियंता संजय निकुडे, कार्यकारी अभियंता एस. एस. आवटी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता साळुंके, बाजार समितीचे सभापती अॅड. संतोष सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. गौतम लटके, रामभाऊ घोगरे आदींनी भेट दिली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


खंडेश्वरवाडी प्रकल्पाच्या भरावाला मोठी भेग पडत्याने भराव कमकुवत झाला असून भराव खचत चालला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, उंडेगाव येथील अनेक नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. शासनाने या प्रकल्पाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. 
- ज्ञानेश्वर कुलकर्णी, नागरिक, उंडेगाव 

(संपादन-प्रताप अवचार)