esakal | मराठवाड्यातील 308 रूग्णांना किडनीची प्रतिक्षा - कशी ते वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नुकताच (ता.१२) मार्चला जागतिक किडनी दिन साजरा करण्यात आला. मराठवाड्यात सध्या ३०८ रूग्ण किडनीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे अनेकांना किडनी दिन हा एकदा नव्हे तर, रोजच किडनी दिन साजरा व्हावा, असेच वाटत असते.

मराठवाड्यातील 308 रूग्णांना किडनीची प्रतिक्षा - कशी ते वाचा

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जगभरातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाबरोबरच मधुमेहाच्या रोग्यांची संख्या वाढते आहे. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये क्रॉनिक किडनी फेल्युअर (डायबेटिक नेफ्रोपॅथी) आणि लघवीद्वारे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे क्रॉनिक किडनी फेल्युअर कारणापैकी हे सगळ्यात महत्वपूर्ण कारण मानले जाते. डायलिसिस करणाऱ्या क्रॉनिक किडनी फेल्युअरच्या शंभर रोग्यांमध्ये ३५ ते ४० रोग्यांची किडनी खराब होण्याचे कारण मधुमेह असते.

किडनी फेल्युअर आणि मधुमेह यांचे अतिशय जवळचे नाते आहे. मधुमेहामुळे रोग्याच्या किडनीवर झालेल्या परिणामांवर जर तातडीने योग्य उपचार केले गेले तर, किडनी फेल्युअर थांबवता येऊ शकते. मधुमेहामुळे किडनी खराब व्हायला सुरुवात झाल्यानंतर हा रोग बरा होऊ शकेलच अशी शक्यता नसते. मात्र, परत योग्य उपचार आणि पथ्य पाळले तर डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार दिर्घकाळापर्यंत टाळता येऊ शकतात.

 हेही वाचा- स्त्रीया का घालतात पैंजण - वाचा

किडनी फेल्युअरचे पहिले लक्षण
किडनीमध्ये प्रत्येक मिनिटाला बाराशे मिली रक्त प्रवाहित होऊन ते शुद्ध होते. किडनीद्वारे प्रवाहित होणाऱ्या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्याने वाढते. त्यामुळे किडनीवर अधिक ताण पडतो. जो नुकसानकारक असतो. दिर्घकाळ किडनीचे असे नुकसान झाले तर, किडनीवरील ताण वाढतो आणि किडनीचे अधिक नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत उच्च रक्तदाब वाढल्यास खराब होणाऱ्या किडनीवर आणखी भर टाकून किडनी कमजोर होते. किडनीला झालेल्या नुकसानीमुळे सुरुवातीला लघवीतून प्रथिने जाऊ लागतात, हे भविष्यातील होणाऱ्या किडनीच्या गंभीर रोगाचे पहिले लक्षण मानले जाते. 

 हेही वाचा- बालवैज्ञानीक करणार आकाशगंगेचे निरीक्षण, कुठे? ते वाचाच

मुत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यास अडथळा
क्रिटीनीन आणि युरियाचे प्रमाण वाढीस लागते. त्यानंतर रक्तचाचणी केल्यास मात्र क्रोनिक किडनी फेल्युअरचे निदान होऊ शकेत. मधुमेहामुळे ज्ञानतंतुला इजा होते आणि मुत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यास अडथळा निर्माण होतो. मूत्राशयात जास्त लघवी साठवून राहते आणि किडणी फुगते त्यामुळे नुकसान होते. यातच साखरेचे प्रमाणात जास्त असलेली लघवी मूत्राशयात दीर्घकाळ राहिल्यास मुत्रसंसर्ग होतो. प्राथमिक अवस्थेत रोगांची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. परंतु, लघवीच्या तपासणीत प्रथिने जाणे हे किडनी रोगाची प्राथमिक लक्षण मानले जाते.


 

आजाराबद्दल जागृतीची गरज

किडनी आणि मधुमेह यांचे खुप जवळचे नाते आहे. त्यामुळे मधुमेहाचा थेट किडनीवर परिणाम होतो. जेव्हा शरिरातून पाणी आणि क्षार बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शरिरावर सूज येऊ लागते आणि वजन वाढू लागते. रक्तदाब वाढतो, किडनी जास्तच खराब झाल्यास शरिरातील रक्तशुद्धीकरणाचे कार्य कमी होते.  या आजाराबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याची मोठी गरज आहे.
- डॉ.विजय मैदपवाड (किडनी विकार तज्ज्ञ, ग्लोबल हॉस्पीटल) 

loading image