आष्टीतील नरभक्षक बिबट्याला ठार मारा : मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांचे आदेश 

अनिरुद्ध धर्माधिकारी
Monday, 7 December 2020

आष्टी तालुक्यासह काही भागांत नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहींना जखमीही व्हावे लागले आहे. मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या या नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्ताच्या त्याला जेरबंद, बेशुद्ध करणे अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश मुख्य वनसंरक्षण अधिकारी नितीन काकोडकर यांनी रविवारी (ता. सहा) रात्री उशिरा दिले.

आष्टी (बीड) : आष्टी तालुक्यासह काही भागांत नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काहींना जखमीही व्हावे लागले आहे. मानवी जिवितास धोकादायक ठरलेल्या या नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्ताच्या त्याला जेरबंद, बेशुद्ध करणे अथवा ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश मुख्य वनसंरक्षण अधिकारी नितीन काकोडकर यांनी रविवारी (ता. सहा) रात्री उशिरा दिले. आमदार सुरेश धस यांनी याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

तालुक्यातील सुरुडी येथे ता. 24 नोव्हेबर रोजी बिबट्याने नागनाथ गर्जे या शेतकर्या चा तालुक्यातील पहिला बळी घेतला. शेतात तुरीला पाणी देत असताना भरदिवसा बिबट्याने झडप घालून तरुणाच्या नरडीचा घोट घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली. त्यानंतर तीनच दिवसांत ता. 27 रोजी सुरुडी परिसरातीलच किन्ही येथे दहावर्षीय स्वराज ऊर्फ यश सुनील भापकर या बालकाचा बिबट्याने बळी घेतला. या घटनांनी तालुक्यातील प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. बिबट्याला शोधण्यासाठी विविध भागांत ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू करण्यात आले. त्यासाठी सुमारे वीस तज्ज्ञांसह सव्वाशे अधिकारी-कर्मचार्यांरचे पथक कार्यरत झाले. वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून आमदार सुरेश धस यांनीही बिबट्याच्या शोधमोहिमेत सहभाग घेतला. 
सध्या शेतामध्ये तूर, कापूस व ज्वारी ही पिके उभी असल्याने असून त्यांना पाणी देवून औषध फवारणी, खुरपणी व पिकांच्या राखणीसाठी शेतकऱ्यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याचा वाढता वावर व प्राणघातक हल्ल्यांमुळे भयभीत व दहशतीत असलेल्या जनतेतून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

मात्र, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 11(1)(क) नुसार मानवी जीवितास धोकादायक ठरलेल्या अनुसूची - 1 मधील वन्य प्राण्यास जेल बंद करणे / बेशुद्ध करणे / ठार मारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 11(1) (क) नुसार परवानगी देणे ही एक वैधानिक बाब असल्याने अत्यंत काळजीपूर्वक तसेच मा. उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार आपल्या विभागामार्फत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात यावा आणि आष्टी मतदारसंघातील बिबट्यांच्या धास्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक अधिकारी, मुख्य वनसंरक्षक कार्यालय औरंगाबाद तसेच विभागीय वन अधिकारी बीड यांच्याकडे पञाद्वारे केली होती. याची दखल घेत राज्याचे मुख्य वनरंक्षक अधिकारी नितीन काकोडकर यांनी नरभक्ष बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत.

 

नरभक्ष बिबट्याने पाथर्डी तालुक्यात दोन, आष्टी तालुक्यात तीन व करमाळा तालुक्यात दोन असे एकूण आठ जणांना शिकार बनवले आहे. त्यामुळे या बिबट्याला ठार मारण्याशिवाय पर्याय उरलेला नसल्याने मी वनविभागाकडे मागणी केली होती. ती मान्य झाली असून बिबट्याला शक्य झालं तर बेशुध्द करून जेरबंद अथवा ठार करून शेतकर्यांना मोकळा श्वास घेऊ दिला पाहीजे. -आमदार सुरेश धस, विधान परिषद सदस्य)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kill maneating leopard Order Chief Conservator Forests Kakodkar