esakal | ‘कोरोना’ करता का म्हणत केली मारहाण अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli crime

तुझी बायको औरंगाबादवरून आली आहे. आम्हालाही कोरोना करशील त्यामुळे तू पाणी भरायला येऊ नको, असे म्‍हणून शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे घडली. 

‘कोरोना’ करता का म्हणत केली मारहाण अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : तालुक्‍यातील माळहिवरा येथे सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी तिघांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली तालुक्‍यातील माळहिवरा येथे मुरलीधर भोकरे हे बुधवारी (ता. २७) सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले होते. या वेळी गावातील गणेश याने आम्‍हाला कोरोना करता का, तुझी बायको औरंगाबादवरून आली आहे. तू पाणी भरायला येऊ नको, असे म्‍हणून शिवीगाळ केली. 

हेही वाचातलाठी दुसऱ्यांदा अडकला एसीबीच्या जाळ्यात, कुठे? ते वाचाच

रॉड, विटा तसेच काठीने मार 

त्यानंतर मुरलीधर भोकरे यांच्या डोक्‍यात कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केले. तसेच अजय याने पाईपने मारून दुखापत केली. तर पंडित याने लोखंडी रॉड डोक्‍यात मारून दुखापत केली. या वेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्यांनाही रॉडने तसेच विटा, काठीने मार दिला. तसेच जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात मुरलीधर भोकरे, मेश्राम भोकरे, अर्चना भोकरे, बन्सीराम भोकरे जखमी झाले आहेत.


कोरोनाच्या धास्तीने डॉक्टरांचा तपासणीस नकार

हिंगोली : तुमच्या भागात कोरोनाची साथ असल्याचे सांगत येथील महिला रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यास दोन डॉक्टरांनी नकार दिल्याचा आरोप करीत त्यांचा दवाखाना सील करून परवाना रद्द करावा, अशी मागणी रुग्णाच्या पतीने पोलिस अधीक्षकांकडे शुक्रवारी (ता. २९) केली आहे.

कुठे राहता याची माहिती घेतली विचारून

शहरातील सिद्धार्थनगरातील ज्‍योती अभयराज खंदारे या महिलेचे सिझरिंग ऑपरेशन सहा महिन्यांपूर्वी झाले आहे. सदर महिला डॉक्‍टरांच्या सुचनेप्रमाणे नियमित वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पती अभयराज खंदारे यांचेसोबत शुक्रवारी शहरातील एका डॉक्‍टरकडे गेले होते. या वेळी संबंधित डॉक्‍टरांनी कुठे राहाता, कुठून आले, यांची माहिती विचारून घेतली. 

दुसऱ्या दवाखान्यात घेतली धाव

सिद्धार्थ भागात राहात आसल्याचे सांगितल्यानंतर तुम्‍ही राहात असलेल्या भागात कोरोनाची साथ असल्याने तपासणी करणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्‍यामुळे श्री. खंदारे यांनी दुसऱ्या दवाखान्यात धाव घेतली. तेथेदेखील कोरोनाची साथ पसरल्याचे कारण सांगत तपासणी करण्यास नकार दिला. या बाबत डॉक्‍टरांनी उपचार न केल्यामुळे त्‍यांच्यावर गुन्हा दाखल करून त्‍यांची सनद कायमस्‍वरूपी रद्द करण्यात यावी, त्‍यांच्या दवाखान्याला सील करावे, अशी मागणी अभयराज खंदारे यांनी केली आहे.

विनाकारण फिरणे तिघांना भोवले

हिंगोली : शहरातील लाचलुचपत कार्यालयाच्या लॉबीमध्ये विनाकारण फिरणाऱ्या तिघांवर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक श्री. गायकवाड यांनी केली आहे.

यावरही क्लिक कराआता गणनिहाय अधिकारी पुरविणार कोरोनाची माहिती

समाधानकारक उत्तरे दिली नाहीत

हिंगोली तालुक्‍यातील केसापूर येथील संतोष टेकाळे, सखाराम टेकाळे, किसन टेकाळे हे तिघे लाचलुचपत कार्यालयाच्या लॉबीमध्ये शुकवारी फिरताना आढळून आले. पोलिस शिपायाने तुमची काही तक्रार आहे का, अशी विचारणा केली. मात्र, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे तिघांनाही पोलिस उपाधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्यासमोर उभे केले. मात्र, त्यांनाही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. 

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लाचलुचपत कार्यालय परिसरात विनाकारण फिरत असल्याची खात्री पोलिस उपाधीक्षक श्री. गायकवाड यांना झाली. शासनाच्या मालकीच्या इमारतीत जाणूनबुजून प्रवेश करून विनाकारण फिरल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई 

 लाचलुचपत कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनी लाचेसंबंधी तक्रार असल्यास कार्यालयात येण्यास कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. या विभागात गोपनीय कामकाज चालते. त्यामुळे कार्यालयात किंवा परिसरात विनाकारण फिरत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा इशारा श्री. गायकवाड यांनी दिला आहे.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

किरकोळ कारणावरून एकास मारहाण

आखाडा बाळापूर :  दुकानातील सामान न दिल्याच्या कारणावरून एकास मारहाण केल्याची घटना कांडली (ता. कळमनुरी) येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता. २८) गुन्हा दाखल झाला आहे. कांडली येथे गजानन सेलगावर हे संजय पानपट्टे यांच्या किराणा दुकानात सामान घेण्यासाठी रविवारी (ता. २४) दुपारी तीनच्या सुमारास गेले होते.

बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा 

 दुकान बंद असल्याने श्री. पानपट्टे यांनी त्यांना सामान दिले नाही. यामुळे रागाच्या भरात येऊन गजानन सेलगावर याने शिवीगाळ करून दुकानातील रॉड घेऊन संजय पानपट्टे यांच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली. या प्रकरणी संजय पानपट्टे यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.