esakal | लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणतात, तो मी नव्हेच! व्हिडीओ होतोय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

Latur District Collector Prithviraj Viral Video News

जिल्ह्यात दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्यासारखे दिसणारे एक अधिकारी हातात काठी घेऊन बाजारपेठेत मास्क न घालता व्यवसाय करणाऱ्यांची तसेच वाहनावर मास्क न घालता जाणाऱ्यांची लाठीने धुलाई करत असल्याचे दिसत आहे.

लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणतात, तो मी नव्हेच! व्हिडीओ होतोय व्हायरल

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. या स्थितीत सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सूचना देऊन आणि दंड करूनही लोक मास्कचा वापर करताना दिसत नाहीत. कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्यामुळे अशा लोकांना आता दंडुकाच उचलण्याची गरज होती. समाजात ही मानसिकता असतानाच जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. हे चिडून जाऊन कोरोनाचा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची धुलाई करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. व्हिडीओतील व्यक्ती `सेम टू सेम` असल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा घडून आली. शेवटी गुरूवारी (ता.आठ) पत्रकार परिषदेत पृथ्वीराज यांना 'तो मी नव्हेच', असा खुलासा करण्याची वेळ आली. 

धक्कादायक! कोरोनाबाधित विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे कळताच उडाला एकच गोंधळ, अनेकांनी काढला पळ  


जिल्ह्यात दोन दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्यासारखे दिसणारे एक अधिकारी हातात काठी घेऊन बाजारपेठेत मास्क न घालता व्यवसाय करणाऱ्यांची तसेच वाहनावर मास्क न घालता जाणाऱ्यांची लाठीने धुलाई करत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पाहता हा व्हिडीओ सर्वांनाच खरा वाटला. मितभाषी व संयमी असलेल्या पृथ्वीराज यांनी चिडून कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बदडून काढावे, अशीच कोरोनाच्या सावटात वावरणाऱ्यांची मानसिकता झाली आहे. कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक लोक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. पोलिस व प्रशासनाकडून या सर्वांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. तरीही लोकांत सुधारणा होताना दिसत नाही.

कोरोना नियम मोडल्याने वधूवरासह ३०० जणांवर कारवाई, थाटात लग्न करणे पडले महागात

प्रशासनाकडूनही कारवाईतील तीव्रता कमी झाली आहे. एकीकडे कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना लोकांची बेफिकीरीही वाढत आहे. यामुळे काही लोकांना लाठीच उगारण्याची गरज आहे. ही मानसिकता असतानाच जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांच्या नावाने सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. पृथ्वीराज काहींची धुलाई करत असल्याचे पाहून नियम पाळणाऱ्यांना आनंद झाला व त्यांच्या धुलाईचे कौतुकही सुरू झाले. कोणीही जिल्हाधिकाऱ्यांनी धुलाई केली म्हणून टीका केली नाही. मात्र, व्हिडीओ बारकाईने पाहिल्यानंतर त्यातील धुलाई करणारे हे पृथ्वीराज नसल्याचे दिसून येते. धुलाई करणारा व्यक्ती जाड असून तो दुसऱ्या राज्यातील कोणी तरी अधिकारी असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी स्पष्ट केले.

दिलासादायक! कोरोनाच्या काळात तरुणासह महिलांना मोसंबीच्या गळपासून मिळतोय रोजगार


अन् झटक्यात दारूबंदी  
मिनी लॉकडाऊनमध्ये हॉटेल व रेस्टारंट्सोबत दारू दुकानेही सुरू राहिली होती. यामुळे या दुकानदारांत आनंद होता. दुसरीकडे दारूची दुकाने सुरू राहिल्याने अन्य व्यावसायिकांत असंतोष व्यक्त होऊ लागला. या स्थितीत दारू दुकानांतून पार्सल सुविधा सुरू ठेवायची की दुकाने बंद करायची, असा प्रश्न होता. सर्व दारू विक्रेत्यांना दुकाने सुरू राहतील, असेच वाटत होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी बुधवारी (ता.सात) रात्री अचानक आदेश काढून लॉकडाऊन संपेपर्यंत सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने सर्वांनाच धक्का बसला. यासोबत त्यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानदार व त्यांच्या कामगारांना लस घेईपर्यंत आरटीपीसीआरऐवजी अँटिजेन तपासणीचा पर्याय खुला केला.

संपादन - गणेश पिटेकर

loading image