
जळकोटमधील पन्नास डॉक्टर व दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लस देण्यासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
जळकोट (लातूर): कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड प्रतिबंधक व्हॅक्सीनचे लसीकरण 422 जणांना पहिल्या टप्प्यात खाजगी व शासकीय डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एस.व्ही पवार यांनी दिली आहे.
जळकोटमधील पन्नास डॉक्टर व दोनशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लस देण्यासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय यंत्रणेतील व खाजगी क्षेत्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अशा एकूण 422 जणांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ.पवार यांनी सांगितले.
'औसा - नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु'
या पहिल्या टप्प्यातील लाभधारकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्याचे लसीकरण येथील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे. एका आठवड्यात सहा लसीकरण मोहीम घेण्यात येणार आहेत. चार आठवड्यामध्ये पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभरानंतर पहिल्या टप्प्याच्या लसीची दुसरी पूरक लस देण्यात येणार आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक जगदीश सुर्यवंशी, डाॅ.कदम, डाॅ.खंडाळे, डाॅ.डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आकाश पवार हे कोरोना लसीकरण मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. तीन टप्प्यात जळकोट शहर व तालुक्यातील सर्व गावांमध्ये अँटी कोरोना लसीकरण मोहीम राबवून ही लस देण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ्या विविध आरोग्य विभागाच्या टीम तयार करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
कोल्हापूरचे सीईओ अमन मित्तल लातूर महापालिकेचे नवे आयुक्त, देविदास टेकाळेंची बदली
दुसऱ्या टप्प्यामध्ये शहर व परिसरातील शासकीय सेवेत असणारे कर्मचारी, नगपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागांतर्गत लोकसेवा करणारे कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षाच्या वरील व्यक्ती व शासनाने त्या त्या वेळी निर्गमित केलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लस देण्यात येणार आहे
(edited by- pramod sarawale)