esakal | 'रेमडीसिव्हीर'साठी पुण्याहून लातूरच्या अधिकाऱ्यांना फोन, मोबाईल क्रमांक व्हायरल होताच औषधांच्या मागणीसाठी हजारो कॉल

बोलून बातमी शोधा

Call From Pune For Remdesivir In Latur News

रेमडीसिव्हीर औषधांचा काळाबाजार व जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या औषधांचे वितरण प्रशासनाच्या हातात घेतले.

'रेमडीसिव्हीर'साठी पुण्याहून लातूरच्या अधिकाऱ्यांना फोन, मोबाईल क्रमांक व्हायरल होताच औषधांच्या मागणीसाठी हजारो कॉल
sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : कोरोनावर गुणकारी रेमडीसिव्हीर औषधांचा पुरवठा जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या हातात घेतला असून यासाठी दोन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक गुरूवारी (ता.आठ) व्हायरल झाले. त्यानंतर अधिकाऱ्यांना रात्रंदिवस हजारो कॉल येत असून त्यांचा मोबाईल हँग होत आहे. लातूरसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती असली तर अधिकाऱ्यांना पुणे, ठाणे व धुळे आदी बाहेरच्या जिल्ह्यातूनही कॉल येत असून गरजू रूग्णांच्या नातेवाईकांकडून रेमडिसिव्हीर औषधांची मागणी करण्यात येत आहे. या कॉलला उत्तर देताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. 

खळबळजनक! बँकेच्या परीक्षेला आलेल्या तरुणाची भोसकून हत्या; हात छाटला


रेमडीसिव्हीर औषधांचा काळाबाजार व जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या औषधांचे वितरण प्रशासनाच्या हातात घेतले. आरोग्य विभागाकडे नोंदणी केलेल्या खासगी रूग्णालयांकडून आलेली रेमडीसिव्हर औषधांची मागणी मुख्य वितरकांकडे पाठवणे व वितरकाकडून आलेला औषधांचा साठा रूग्णालयांना वितरित करण्याचे काम मागील तीन दिवसांपासून प्रशासन करत आहे. औषधी गरजू रूग्णांना मिळेपर्यंत प्रशासन पाठपुरावा करत आहे. यासाठी जिल्हापुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे व उपजिल्हाधिकारी (सामान्य) गणेश महाडिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.पडदुणे हे रूग्णालयांकडून औषधांची मागणी घेऊन तो प्रशासनाला पाठवणे व प्रशासनाकडून वितरित झालेली औषधे रूग्णांना मिळतात की नाही, याची पडताळणी करतात. तर श्री. महाडिक यांच्याकडे मुख्य वितरकांकडे दररोज औषधांची मागणी नोंदवणे व आलेल्या साठ्याचे रूग्णालयांच्या मागणीप्रमाणे वितरण करण्याची जबाबदारी आहे.

मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, पतीच्या मित्रानेच पत्नीवर तीन वर्षे अत्याचार करुन उकळले पैसे

गुरूवारी या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाईल पत्रकार परिषदेतून जाहीर करण्यात आले. त्यानंतर दोघांच्या मोबाईलवर हजारो कॉल येण्यास सुरवात झाली. रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून रेमडिसिव्हीर औषधांची मागणी होऊ लागली. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तरे देताना अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले. काही कॉल तर ठाणे, पुणे, धुळे, उस्मानाबाद या  जिल्ह्यातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे होते. त्यांच्याकडूनही रेमडिसिव्हीर औषधांची मागणी झाली. त्यांना आम्ही केवळ लातूर जिल्ह्यासाठीच असल्याचे सांगताना अधिकाऱ्यांची कसरत झाली. दरम्यान अजूनही रूग्ण व नातेवाईकांचे हजारो कॉल येणे सुरूच असून याला पर्याय म्हणून नांदेडच्या धर्तीवर स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे पडदुणे यांनी सांगितले. दरम्यान गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये असेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर व्हायरल झाले होते. त्यांनाही हजारो कॉल येऊन मोबाईल हँग झाले. रेमडिसिव्हीरच्या निमित्ताने या घटनेला उजाळा मिळाला. यातच शुक्रवारी (ता.नऊ) सायंकाळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी औषधी दुकानांना अचानक भेटी देऊन रेमडीसिव्हिर व अन्य औषधांची चौकशी केली. या वेळी महापालिका आयुक्त अमन मित्तल, सहायक आयुक्त सुंदर बोंदर, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे उपस्थित होते.

उस्मानाबादच्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, इंजेक्शन मिळेना; उपचारासाठी गाठावे लागते बार्शी अन् सोलापूर

नांदेडच्या धर्तीवर मदत कक्ष

दरम्यान अजूनही रूग्ण व नातेवाईकांचे हजारो कॉल येणे सुरूच असून याला पर्याय म्हणून नांदेडच्या धर्तीवर स्वतंत्र मदत कक्ष (हेल्प डेस्क) सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे पडदुने यांनी सांगितले. दरम्यान गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये असेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर व्हायरल झाले होते. त्यांनाही हजारो कॉल येऊन मोबाईल हँग झाले. रेमडिसिव्हीरच्या निमित्ताने या घटनेला उजाळा मिळाला. यातच शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी औषधी दुकानांना अचानक भेटी देऊन रेमडीसिव्हिर व अन्य औषधांची चौकशी केली. या वेळी महापालिका आयुक्त अमन मित्तल, सहायक आयुक्त सुंदर बोंदर, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे उपस्थित होते.

धरसोड वृत्तीतून घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप वाढला - भागवत कराड

अचानक `यु` टर्न

आरोग्य विभागाकडे नोंदणी केलेल्या खासगी रूग्णालयालाच जिल्हा प्रशासनाकडून रेमडिसिव्हीर औषधांचे वितरण केले जात आहे. गुरूवारी पहिले वितरण झाल्यानंतर खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला. यामुळे प्रशासनाला गुरूवारी रात्री अचानक `यु` टर्न घेत आरोग्य विभागाकडे नोंदणी न केलेल्या व कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रूग्णालयांसाठी तीन औषध दुकानात नव्वद रेमडीसिव्हीरचा साठा उपलब्ध करून द्यावा लागला. त्याची माहिती सोशल मीडियावरून देऊन रूग्णांनी औषधांसाठी संपर्क करण्याचे आवाहन करावे लागले. यानिमित्ताने शहरातील अनेक खासगी रूग्णालयात आरोग्य विभागाची परवानगी न घेता कोरोना रूग्णांवर उपचार सुरू असल्याचे पुढे आले.

संपादन - गणेश पिटेकर