

Latur News
esakal
लातूर: शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात सुलभ स्वच्छतागृह असतानाही अनेक प्रवासी उघड्यावर लघुशंका करतात, काही जण तर थांबलेल्या बसच्या मागे जाऊन आडोसा शोधतात. त्यामुळे बसस्थानकाच्या आवारात घोंगावणाऱ्या माशा अन् वाढत्या दुर्गंधीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळेच ‘दोन रुपये घ्या; पण बसस्थानकाच्या आवारातील दुर्गंधी संपवा!’ अशी भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.