डॉक्टर देव मग घरी जाताना दानव का दिसतो? 

हरी तुगावकर
Sunday, 2 August 2020

डॉक्टर आणि प्रतिष्ठीत नागरीकांच्या बैठकीतील सूर

लातूर : शहरात अनेक डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णालयातील इतर कर्मचारी भयभीत आहेत. तरी देखील कोरोनाच्या रुग्णावर योग्य उपचार व्हावेत या करीता डॉक्टर प्रयत्न करीत आहेत. असे असताना त्यांच्यावर हल्ला करणे, त्यांच्या बद्दल समाज माध्यमातून चुकीचे माहिती प्रसारित करण्याचा काही जण जाणिवपूर्वक प्रयत्न करीत आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

उपचाराच्या वेळी डॉक्टर देव असतो मग घरी जाताना तो दानव का दिसतो? असा प्रश्न उपस्थितीत करून आम्हाला फक्त समाजाच्या पाठिंब्यांची गरज आहे, असा सूर येथे रविवारी (ता. दोन) झालेल्या शहरातील डॉक्टर्स, प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकारांच्या बैठकीत डॉक्टरांनी व्यक्त केला.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांच्या पुढाकारातून झूम ॲपद्वारे ही बैठक घेण्यात आली. खासगी कोविड हॉस्पीटलचे डॉक्टर सध्या कोणकोणत्या अडचणीला सामोरे जात आहेत यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच कोरोना रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी काय काय केले जाते याची माहितीही यावेळी देण्यात आले.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

कोण काय म्हणाले....

डॉ. अशोक कुकडे, प्रमुख, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान ः समाज माध्यमातून सध्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल विपरीत लिहिले जात आहे. डॉक्टरांच्या कामाबद्दल बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. वैद्यकीय व्यवसायाला ब्लॅकमेल करण्याचा उद्देश असेल तर त्याचा समाजावर अधिक परिणाम होणार आहे. समाजाने डॉक्टरवर विश्वास ठेवण्याची गरज आहे.

डॉ. विश्वास कुलकर्णी, अध्यक्ष आयएमए, संघटना - शहरात एका डॉक्टरवर हल्ला झाला. तो वाचला म्हणून दुःख होणाऱया पोस्ट फिरवल्या गेल्या. काहीही माहित न घेता बील जास्त घेतल्याच्या बातम्या फिरवल्या जात आहेत. दुषित वातावरण तयार होत असून ते समाजासाठी घातक आहे. `गरज सरो वैद्य मरो` अशी भूमिका रुग्णाच्या नातेवाईकांनी घेणे चुकीची आहे. शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनाच्या रुग्णावर उपचार केले जात आहेत.

डॉ. ब्रिजमोहन झंवर, विवेकानंद कर्करोग रुग्णालय - कोविड रुग्णालयात सर्व काळजी घेवून उपचार केले जात असल्याने ओव्हर हेड खर्च वाढलेले आहेत. हे समाजाने लक्षात घेतले पाहिजे. शासनाकडून खासगी रुग्णालयाला कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. दीड लाख रुपये मिळतात या सर्व अफवा आहेत. रुग्णालयात आल्यानंतर तातडीने स्वॅब घेवून अहवाल देण्याचा आग्रह धरला जातो.  पण शासकीय यंत्रणेतून शक्य नाही. उपचार म्हत्वाचे असतात. ते डॉक्टरांवर सोडावे.

डॉ. राहूल सूळ, सूळ रुग्णालय - वेगवेगळ्या उपाय योजना कराव्या लागत असल्याने कोविड रुग्णालयाचा खर्च वाढला आहे. सध्या डॉक्टर व त्यांचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यांची प्रतिमा मलिन होवू देवू नका. रुग्ण कसा बरा होईल हेच पाहिले जाते. कोरोनाच्या रुग्णाला इतर आजार असतील तर त्याच्या उपचाराचा खर्च वाढतो.  पण बील जास्त लावले जाते असा अपप्रचार करणे चुकीचे आहे.

डॉ. दीपक गुगळे, गुगळे रुग्णालय - डॉक्टर, कर्मचारी पॉझिटीव्ह येत आहेत. त्यामुळे ते महिनाभर रुग्णालयात येवू शकत नाहीत. दुसरा स्टाफ कोठून आणायचा प्रश्न आहे. या कामात स्वयंसेवकानी पुढे येवून मदत करण्याची गरज आहे. रुग्णालय व रुग्णाचे नातेवाईकात त्यांनी दुवा म्हणून काम करावे. असे झाले तर डॉक्टर काम करू शकतील.

लक्ष्मीरमण लाहोटी, अध्यक्ष, दयानंद शिक्षण संस्था - डॉक्टरांना आपण देव समजतो. त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांची बदनामी करणे चुकीचे आहे. सध्या अडचणीचा काळ आहे. समाजाने त्यांच्यासोबत राहिले पाहिजे. एनएसएसची मुले स्वयंसेवक म्हणून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

डॉ. अशोक पोद्दार, पोद्दार रुग्णालय - कोरोनाच्या चाचण्यात फॉल्स निगेटीव्हीटी रेट आहे. पण सीटी स्कॅन केल्यानंतर रुग्ण आजारी आहे का ते लक्षात येते. त्यातून पुढे उपचार केले जातात. डॉक्टर चुकीचे उपचार करीत आहेत अशी बदनामी करणे चुकीचे आहे.

Edited By Pratap Awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur case of beating doctor IMA meeting