Latur : पीडब्लूडी-महापालिकेच्या वादात पंधरा दिवसांपासून नागरिक तहानलेले

फुटकी जलवाहिनी जोडायची कुणी?
Latur news
Latur newsesakal

लातूर : शहरातील जुन्या रेल्वेलाइनवरील रस्त्यावर सध्या काम सुरू आहे. या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग ‘पीडब्लूडी’च्या कंत्राटदाराकडून पाणी पुरवठ्याची जलवाहिनी तुटली. ही जलवाहिनी जोडण्याचे काम पीडब्लूडीने करावे, असा हट्ट महानगरपालिकेने धरला असून पीडब्लूडीने जलवाहिनीचे स्थलांतरीत करण्याचे पत्र आधीच दिल्याचे सांगत जलवाहिनी दुरुस्तीसाठी हात वर केले. या वादात पंधरा दिवसापासून सितारामनगर, शिवाजीनगर व सिंधी कॉलनी या तीन भागाचा पाणी पुरवठा बंद पडला आहे. गुरूनानक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमालाही याचा फटका बसणार आहे.

Latur news
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून सातत्याने सुरू आहे. मध्यंतरी या रस्त्याचे काम झाल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्यातील दुभाजकाची रुंदी कमी करून दुतर्फा रस्ता मोठा केला. मात्र, रस्त्याचे काम तडीस गेले नाही. वर्षांपूर्वी या रस्त्याच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले. रस्त्याला विलासराव देशमुख मार्ग असे नाव देऊन काम सुरू करण्यात आले. कधी वेगाने, कधी मंद गतीने तर कधीच कामच बंद, या पद्धतीने या मार्गाचे काम सुरू आहे. महापालिकेच्या हद्दीतील रस्ता असला तरी हे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे.

Latur news
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

काम सुरू करताना रस्त्याच्या बाजूने व रस्त्याखालून गेलेल्या सर्व पाणी पुरवठ्याच्या जलवाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत बांधकाम विभागाने महापालिकेला पत्र दिले होते. मात्र, महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. प्रतीक्षा करून कंत्राटदाराने पाणी पुरवठ्याची जलवाहिनी उखडून टाकली. यामुळे १५ दिवसापासून तीन भागाला होणारा पाणी पुरवठा बंद पडला. जलवाहिनी कंत्राटदाराने तोडल्यामुळे ती त्यानेच जोडून द्यावी, असा हट्ट महापालिकेने धरला तर काम सुरू करण्यापूर्वी पत्र दिल्याचे दाखवून बांधकाम विभागाने हे काम करण्यास नकार दिला. शेवटी जलवाहिनी जोडणार कोण, असा प्रश्न निर्माणझाला.

Latur news
Career Tips : करिअरमध्ये अपयशाची चिंता न करता शिकत राहणे महत्वाचे; ठेवा सकारात्मक दृष्टिकोन

नागरिकांची ओरड होऊनही महापालिकेकडून जलवाहिनी जोडण्याचे हाती न घेतल्याने आणखी किती दिवस पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.रस्ता कामात जलवाहिनी फुटून पंधरा दिवस होऊन गेले. ती दुरुस्ती करण्यासाठी पीडब्लूडी व महापालिकेचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. वास्तविक ही जबाबदारी महापालिकेची असून आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा काढला जात नाही. महापालिकेच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

— दीपक मठपती,माजी सभापती, स्थायी समिती, महापालिका.

रस्ता कामात जलवाहिनी फुटून पंधरा दिवस होऊन गेले. ती दुरुस्ती करण्यासाठी पीडब्लूडी व महापालिकेचे अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. वास्तविक ही जबाबदारी महापालिकेची असून आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर तोडगा काढला जात नाही. महापालिकेच्या मनमानी कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.

— दीपक मठपती, माजी सभापती, स्थायी समिती, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com