esakal | Corona Update : लातूरात कोरोनामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू ; डॉक्टरला कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा गुरूवारी (ता. २) सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १९ झाली आहे. दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचीही माहिती समोर आली आहे.

 

Corona Update : लातूरात कोरोनामुळे ज्येष्ठ महिलेचा मृत्यू ; डॉक्टरला कोरोनाची लागण

sakal_logo
By
सुशांत सांगवे

लातूर : लातूरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढताना दिसू लागली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा गुरूवारी (ता. २) सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १९ झाली आहे. दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचीही माहिती समोर आली आहे. डॉक्टरांना कोरोनाची लागण होण्याची शहरातील ही दुसरी घटना आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

लातूर जिल्ह्यात आजवर २०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १६६ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, आजवर १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १९ मधील १२ मृत्यू हे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत झाले आहेत. उदगीरमधील उपजिल्हा रूग्णालयात ६ जणांचा तर पुण्यातील खासगी रूग्णालयात लातूरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संस्थेत गुरूवारी (ता. २) मृत्यू झालेल्या महिलेचे ६४ वय होते.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

त्या साई भागात राहत होत्या. त्यांना अतिताण आणि रक्तदाबाचा त्रास होतो. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अवघ्या दीड दिवसातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात त्या उशिरा आल्या, अशी माहिती संस्थेतर्फे सांगण्यात आली.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

लातूर शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता. १) तब्बल ३३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात औसा तालूक्यातील १७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे औशातील नागरिकांची आता चिंता वाढली आहे. या रुग्णांत सारोळा येथील १२, एरंडी येथील ३ तर आलमला आणि माळकोंडजी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. लातूरातील रूग्ण झिंगणप्पा गल्ली (२), सुळ गल्ली, साई नाका, केशव नगर, लेबर कॉलनी, जीएमसी रस्ता, नरसिंह नगर, शिवनगर, नाथ नगर, नारायण नगर (प्रत्येकी १) या भागातील आहेत. यात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा समावेश आहे. उर्वरित रुग्ण रेणापूर येथील इंदरठाणा (१), उदगीरमधील यशवंत नगर (१), अहदमपूरमधील महात्मा गांधी महाविद्यालय (१), शिरूर ताजबंद (१) येथील आहेत, असे आरोग्य विभागातर्फे गुरूवारी जाहीर करण्यात आले.