esakal | दिवाळी संपताच कोरोनाचा आघात, लातुरात चार रूग्णांचा मृत्यू; नवे 18 रूग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona death new.jpg

जिल्ह्यात दिवाळी संपताच कोरोनाचा आघात सुरू झाला असून मंगळवारी (ता. 17) चार रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 18 नवीन रूग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्याची रूग्णांची संख्या आता एकेवीस हजारापर्यंत पोहचली असून उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 294 पर्यंत खाली आली आहे.

दिवाळी संपताच कोरोनाचा आघात, लातुरात चार रूग्णांचा मृत्यू; नवे 18 रूग्ण

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात दिवाळी संपताच कोरोनाचा आघात सुरू झाला असून मंगळवारी (ता. 17) चार रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 18 नवीन रूग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्याची रूग्णांची संख्या आता एकेवीस हजारापर्यंत पोहचली असून उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या 294 पर्यंत खाली आली आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरू झाल्यापासून कोरोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नव्हता. यामुळेच मागील पाच दिवसापासून जिल्ह्यातील रूग्णसंख्या 631 वर स्थिर होती. मंगळवारी दिवाळी संपताच कोरोनामुळे चौघांचा मृत्यू होऊन मृत्यूची संख्या 635 झाली आहे. यात मंगळवारी दिवसभरात केलेल्या 63 आरटीपीसीआर तपासणीत नऊ तर 131 रॅपीड अँटीजन तपासणीत नऊ असे 18 नवीन रूग्ण आढळून आले.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दिवाळीच्या कालावधीत रूग्णसंख्या कमीच आढळून आली. यासोबत रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले. यामुळे जिल्ह्यात सध्या केवळ 294 रूग्ण असून त्यापैकी 135 रूग्ण गृहविलगीकरणातूनच कोरोनाशी लढा देत आहेत. रूग्णसंख्या एकेवीस हजार दोन झाली असून बरे झालेल्यांची संख्या वीस हजार 73 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 16 हजार 884 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 38 हजार 578 जणांच्या आरटीपीसीआर तपासणीत सात हजार 285 तर 78 हजार 306 जणांच्या रॅपीड अँटीजन तपासणीत 13 हजार 717 रूग्ण आढळून आले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)