
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होत असली तरी रोज सरासरी ३० ते ४० रुग्ण आढळत आहेत.
लातूर : जिल्ह्यात दहा महिन्यांत दोन लाख एक हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यात २४ हजार २८१ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी २३ हजार २५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारादरम्यान ६८८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४२ जणांवर उपचार सुरु आहेत. यापैकी १७६ जण घरी उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. सुरवातीच्या काळात आरोग्य विभागाने आरटीपीसीआर चाचणीवर भर दिला. त्यानंतर ॲन्टीजेन चाचण्या सुरु झाल्या. दहा महिन्यांत दोन लाख एक हजार ९०३ जणांच्या कोरोना चाचण्या झाल्या. यात एक लाख २४ हजार १८२ हजार जणांच्या ॲन्टीजेन तर ७७ हजार ७२१ जणांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या काहीशी कमी होत असली तरी रोज सरासरी ३० ते ४० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. नागरीकांनी काळजी घेण्याची गरज आहेच. दरम्यान, सध्या कोरोना योद्ध्यांना लस देण्याचा कार्यक्रम सुरु आहे.
महिनानिहाय रुग्णसंख्या
एप्रिल २०२०---१६
मे २०२० ---११९
जून २०२०--२१४
जुलै २०२०--१८५१
ऑगस्ट २०२०---५९११
सप्टेंबर २०२०---९१८८
ऑक्टोबर २०२०--३०२२
नोव्हेंबर २०२०---१५५५
डिसेंबर २०२०---११५०
जानेवारी २०२१---११९५
Edited - Ganesh Pitekar