esakal | Latur Crime : उदगीरमध्ये अत्याचार पीडितेला जीवे मारण्याची धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Crime : उदगीरमध्ये अत्याचार पीडितेला जीवे मारण्याची धमकी

तिचे पती ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर होऊन दिलेल्या जबाबानुसार विनयभंग व गंभीर मारहाण गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही.

Latur Crime : उदगीरमध्ये अत्याचार पीडितेला जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : येथील Udgir ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीकडून पीडित महिलेला घरात घुसून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. त्यांना अटक करून ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांकडे पीडित महिलेने निवेदनाद्वारे केली आहे. यातील महिला फिर्यादीस ता.१७ मे रोजी सकाळी सहा ते दुपारी ३ वाजेपर्यंत Latur फिर्यादीची सवत व इतर पिके बार समोर देगलूर रोड येथे राहणाऱ्या आठ आरोपींनी संगनमत करून, बेकायदेशीर मंडळी जमवुन फिर्यादीस माझ्या नवऱ्याला ठेवून का घेतलीस याबाबतच झालेला भांडणतंटा मिटवायचे म्हणून आरोपीच्या घरी घेऊन जाऊन हातात काठ्या, सळई, बिब्याचे तेल घेऊन मारहाण करून गंभीर दुखापत केली. यातील काही आरोपीने सामूहिक बलात्कार केला. जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी ही गंभीर असल्याने तिला लातूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. latur crime news accused give threaten to a victim in udgir

हेही वाचा: मोदींच्या मंत्रिमंडळात भागवत कराड?,खासदार मुंबईला रवाना

तिचे पती ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर होऊन दिलेल्या जबाबानुसार विनयभंग व गंभीर मारहाण गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीने ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला नाही. आता ज्या विचारल्यानंतर काही दिवसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतरही या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्याने व हे आरोपी मोकाट असल्याने फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन त्यांनी सगळे मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदन दोन दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल जाॅन बेन यांच्याकडे सादर केले आहे.

हेही वाचा: पप्पा! मला माफ करा,असे सुसाईड नोट लिहून मुलीने संपवले आयुष्य

पोलिस निरीक्षकावर गंभीर आरोप

या निवेदनात पीडित महिलेने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्री.वाघमारे हे या आरोपींना जाणून-बुजून पाठीशी घालत असुन हे आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना होऊन त्यांच्याकडून हा गुन्हा तात्काळ वर्ग करण्यात यावा व त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिलेने केली आहे.

loading image