esakal | Latur: वर्षभरात नऊशे गुन्हेगारांना शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

लातूर : वर्षभरात नऊशे गुन्हेगारांना शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : येथील पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बुधवारी (ता. १३) वर्ष झाले. या वर्षभराच्या कालावधीत त्यांनी गुन्हेगारांवर चांगलाच जरब बसवला आहे. एक वर्षाच्या कालावधीत एकूण ८६६ गुन्ह्यांत ९०० पेक्षा अधिक गुन्हेगारांना न्यायालयात शिक्षा झाली आहे. शिक्षा होण्याचे प्रमाण कन्वेक्शन रेट ५३ टक्के आहे. आतापर्यंतचा हा सर्वाधिक शिक्षेचा रेट आहे.

श्री. पिंगळे यांनी ता. १३ ऑक्टोबर २०२० रोजी पोलिस अधिक्षक पदाचा कारभार स्वीकारला होता. वर्षभरात हेळंब वलांडी येथील खून, याकतपूर रोड (औसा) येथील खून, सावरगाव येथील खून, किल्लारी पोलिस ठाणे हद्दीतील दोन वयोवृद्ध महिलांचा खून व गुऱ्हाळ (ता. निलंगा) येथील वृद्धेचा खून हे सर्व खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदपूर आणि उदगीर येथील ट्रक चालकांच्या खुनाच्या गुन्ह्यातही तातडीने तपासाची चक्र फिरवून हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. या कालावधीमध्ये जिल्ह्यात दरोड्याचे आणि जबरी चोरीचे १२८ गुन्हे नोंद झाले होते.

हेही वाचा: जालना : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

त्यापैकी ८७ गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले. गुन्ह्यात गेलेल्या मालापैकी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. याच बरोबर एकूण १५८ चोऱ्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून जवळपास ९० लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये शस्त्रास्त्रे शोध मोहीम घेण्यात आली. ज्यामध्ये चार पिस्टन, चाकू, सुरे आणि तलवारी मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या. या संबंधाने भारतीय हत्यार कायद्यानुसार २२ गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. जिल्ह्यात अवैध व्यवसाय विरोधात वारंवार मोहिमा राबविण्यात आल्या.

वर्षभरात अवैध दारू विक्रीवर छापे मारून दोन हजार ३०९ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात १ कोटी ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच अवैद्य जुगार मटका यावर छापा मारून ६८६ गुन्हे नोंदविण्यात आले असून, १ कोटी २ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एनडीपीएस कायद्यांतर्गत गांजा बाळगल्याच्या ९ केसेस करण्यात आल्या असून, ६० लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर धाडी मारुन ६२ केसेस करण्यात आल्या असून २ कोटी ६९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैध धंद्यावर आळा घालण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मोटार वाहन कायद्याखाली एकूण १ कोटी ४८ लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नांदेड : शेतात पिकले तेवढे वाहून गेले; एका रात्रीत झाले होत्याचे नव्हते

पोलिस दलही सुसज्ज

श्री. पिंगळे यांनी पाठपुरावा करून डीपीसीमधून २८ बोलेरो गाड्या आणि ५१ दुचाकी पोलिस दलाला मिळवून दिल्या. जिल्हाभरात कुठल्याही घटनेची खबर मिळताच लवकरात-लवकर पोचता यावे, या साठीची डायल ११२ प्रणाली कार्यान्वित केली आहे. एकूण ४३७ पोलिस अंमलदारांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. पोलिस दलही सुसज्ज ठेवण्यात त्यांना यश आले आहे.

loading image
go to top