esakal | ज्या कार्यालयात निरीक्षक, त्याच कार्यालयाचा बनला आयुक्त, चाकूरच्या शेतकरी मुलाची झेप..!
sakal

बोलून बातमी शोधा

LATUR.jpg

ज्या विभागात नोकरी करीत आहे. तेथेच सहाय्यक विक्रीकर आयुक्त या उच्च पदावर निवड झाली. कबनसांगवी (ता.चाकूर) येथील शेतकऱ्याचा मुलाची ही झेप सर्वांना   प्रेरणा देणारी आहे. 

ज्या कार्यालयात निरीक्षक, त्याच कार्यालयाचा बनला आयुक्त, चाकूरच्या शेतकरी मुलाची झेप..!

sakal_logo
By
प्रशांत शेटे

चाकुर (जि. लातूर ) : ग्रामीण भाग, कमकुवत आर्थिक परिस्थती हा न्युनगंड बाजूला ठेऊन ध्येय साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रीत करावे लागते. यातून यश मिळविता येते याची प्रचिती मला आली. ज्या विभागात नोकरी करीत आहे. तेथेच सहाय्यक विक्रीकर आयुक्त या उच्च पदावर निवड झालेल्या कबनसांगवी (ता.चाकूर) येथील शेतकऱ्याचा मुलगा गुणाजी मारोती क्षीरसागर यांनी ही भावना व्यक्त केली. 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात कबनसांगवी (ता.चाकूर) येथील गुणाजी मारोती क्षीरसागर यांची खुल्या प्रवर्गातून ८८ वी रँक मिळवीत सहाय्यक विक्रीकर आयुक्त पदी निवड झाली आहे.

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुणाजी यांच्या वडीलांना पाच एकर जमीन असून तीन मुली व एक मुलगा असे कुटुंब आहे. आई - वडील दिवसरात्र शेतात कष्ट करतात. त्यांच्या कष्टाला फळ मिळावे यासाठी राज्य सेवेतून अधिकारी होण्याचे ध्येय ठरविले.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता...

 दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केल्यानंतर बारावी विज्ञान आणि कला शाखेतून पदवी व राज्यशास्त्रातून एम.ए. चे शिक्षण लातूर येथे पुर्ण केले. कुठेही शिकवणीला न जाता स्वतः स्पर्धा परीक्षेच्या आभ्यासाला सुरूवात केली.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

 २०१७ साली झालेल्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात विक्रीकर निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. मुंबई येथे नोकरी करीत असताना पुन्हा परीक्षेची तयारी सुरु केली. प्रश्नपत्रिकेचा सराव, संदर्भ ग्रंथाचे वाचन, वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत दिवसातून आठ ते दहा तास अभ्यास करून सहाय्यक विक्रीकर आयु्क्तपद मिळवीले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गावात मित्रांनी मिरवणूक काढून सत्कार केला.    

ज्या कार्यालयात दिड वर्षे नोकरी केली. त्याच कार्यालयातील उच्च पदावर निवड झाल्याचा वेगळा आनंद आहे. भविष्यात मोठया पदावर जाण्याचे माझे ध्येय असून ते गाठण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. 
गुणाजी क्षीरसागर 

मुलगा साहेब झाला याचा आनंद आहे. आम्ही पती, पत्नी दोघेंही निरक्षर आहोत. मुलगा परीक्षा देत आहे एवढेच आम्हाला माहिती होते परंतू त्याचा निकाल गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी सत्कार केल्यास तो एवढा मोठा साहेब झाल्याचा आनंद झाला. 
मारोती क्षीरसागर (वडील)