
मासे पकडण्यासाठी गेलेल्या बाप लेकावर काळाने घाला घातला. जोरदार पाऊस आल्याने ते धसवाडी मध्यम प्रकल्पात वाहून गेले. बापाचा देह पाण्यात तरंगला होता. तर बारा वर्षाचा मुलगा दोनशे फूट पाण्यात गाळात अडकला होता. दोघांचा करून अंत झाला. या घटनेने अहमदपूर तालुक्यातील अंधोरी गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अहमदपूर (लातूर) : तालुक्यातील अंधोरी येथील दोघे धसवाडी मध्यम प्रकल्पातील पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
सोमवारी (ता.२०) रज्जाक रशिद शेख (४५) व मुलगा शाहेद रज्जाक शेख (१२ ) हे बाप-लेक गावापासून दीड किलोमीटर अंतरावर लेंडी नदीवर असलेल्या धसवाडी मध्यम प्रकल्पाच्या नाल्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. नदीवरील बंधा-याच्या पाईपला मासे पकडण्यासाठी जाळी लावून ते दोघे पाईपाजवळ बसले. दरम्यान परिसरात अचानक अर्धा तासात ३८ मिलीमीटर नोंदींचा पाऊस झाला.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
या जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अधिक झाला. यावेळी दोघेही वाहत धसवाडी मध्यम प्रकल्पात गेले. वडीलांचा मृतदेह तरंगताना तर मुलाचा मृतदेह दोनशे फुट अंतरावर पुलाच्या चिखलात रूतलेला आढळला. अंधोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळी शवविच्छेदन करुन रात्री उशीरा त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक खुब्बा चव्हाण. पोलिस उपनिरिक्षक गजानन अन्सापूरे यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेचा पंचनामा केला. पोलीस पाटील यलबाजी संभाजी नलवाडे यांनी किनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद केला आहे.