esakal | कथा युवा शेतकऱ्याची : कोरोनाच्या सावटातही रोपवाटीकेला जिवंत ठेवले, मिळविले लाखोंचे उत्पन्न 
sakal

बोलून बातमी शोधा

ROPWAtika.jpg

टाळे बंदीत सर्व व्यवसाय झाले ठप्प मात्र रोप विक्री व्यवसाय झाला गतीमान.

कथा युवा शेतकऱ्याची : कोरोनाच्या सावटातही रोपवाटीकेला जिवंत ठेवले, मिळविले लाखोंचे उत्पन्न 

sakal_logo
By
प्रा. रत्नाकर नळेगावकर

अहमदपूर (लातूर) : कोरोना संसर्गामुळे झालेल्या टाळेबंदीत सर्वच व्यवसाय अडचणीत आले. मात्र, लातूर जिल्ह्यातील एका युवा शेतक-याचा रोपवाटीकेचा व्यवसाय गतीमान झाला. त्याने कोरोनाच्या सावटात अतिशय मेहनत करुन रोपवाटीकेला जीवंत ठेवले तर रोपवाटीकेच्या उत्पन्नातून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे. त्यामुळे टाळे बंदीनंतर व्यवसायावर आलेल्या सावटात ही बातमी सर्वांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील एका युवा शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून रोपवाटीका चालू केली. मागील काळात रोपांची मागणी कमी झाली होती. त्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोपवाटीका बंदच राहणार हे निश्‍चितच होते. मात्र या महामारीत देखील दिलासादायक बाब म्हणजे या तरुण शेतकर्याचा रोपवाटीकेचा व्यवसायाने जोर धरला. हजारो- लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

किनगाव शिवारात पाच एकर जमीन असलेले कनिष्ठ महाविद्यालय पर्यंत शिक्षण घेतलेले ज्योतिराम बालाजी शेळके हे आपल्या आई, वडील व पत्नीसह शेती करतात. चार एकर जागेत कलम करण्यासाठी लागणारे वृक्ष तर एक एकर जागेत तयार रोपं आहेत. विहीर , विंधन विहीर व अठरा लाख लिटर पाणी साठा असलेल्या शेततळ्यातील पाण्याचा उपयोग या रोप वाटीकेसाठी केला जातो. कोरोना काळात  फळगटातील  लिंबोनी, चिकू, संत्रा, मोसंबी, सिताफळ, पपई, फणस, नारळ, आवळा, पेरू, अंबा  फूल गटातील मोगरा, गुलाब, जास्वंद तर शिरकी, कडुलिंब, करंज, शेवगा अशा जवळपास पन्नास प्रकारच्या दिड लाख रोपांची उत्पत्ती या युवा शेतक-यांने केली आहे. जुन ते सप्टेंबर या कालावधीत रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात असते. मागील काळात रोप विक्री मंदावली होती. मात्र या वर्षी जिल्ह्यासह बुलढाणा, हदगाव, मेहकर, कळमनुरी या ठिकाणाहून नागरिकांनी रोपांची मागणी केली. रोपांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. टाळे बंदीत जवळपास सर्व व्यवसाय अडचणीत सापडले असताना या युवा शेतक-यांचा रोप वाटीकेचा  व्यवसाय बहरला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कृषी विषयी अधिकृत शिक्षण झाले नाही. तरी देखील रोपांवर पडलेल्या किडी किंवा बुरशी जन्यरोगांबद्दल वेळोवेळी कृषी तज्ञांचा सल्ला घेऊन ते रोग नियंत्रण करतात. रोप वाटीकेची देखरेख हा युवा शेतकरी स्वतः चोवीस तास शेतात काम करतो. कोरोना काळात रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विश्वसनीय सेवा, वाहतूक सोईस्कर यामुळे पर जिल्ह्यातील लोकांनी रोपांची मागणी केली. रोपांना जीवापाड जपतो. या वर्षी दिड लाख रोपांची निर्मिती केली असून दर वर्षी पेक्षा या वर्षी रोपांच्या विक्रीत तीन पट अधिक वाढ झाली आहे. 
-ज्योतिराम शेळके, शेतकरी, किनगाव.

(संपादन-प्रताप अवचार)