
लग्नातील जेवनात गोड पदार्थ म्हणून ठेवण्यात आलेल्या चकलीसाठी वापरण्यात येणाऱ्या खव्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उदगीर (जि.लातूर) : वाढवणा बुद्रूक (ता.उदगीर) येथे रविवारी (ता.२४) लग्नसमारंभात जेवणातून विषबाधा झाल्यामुळे १२७ बाधित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. उपचारानंतर प्रकृती सुधारलेल्या रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. आज सोमवारी (ता.२५) सायंकाळपर्यत सर्वांना सुटी देण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे यांनी दिली. व्यापारी इसाक हवालदार यांच्या मुलीचा विवाह रविवारी पार पडला.
धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया,‘मी राजकीय भांडवल केले नसते’
या विवाह सोहळ्यात अनेकांनी जेवण केले. जेवणानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि मळमळीचा त्रास जाणवू लागल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी रुग्णालयात रात्री उशिरापर्यत १२७ रुग्णाला त्रास होत असल्यामुळे उपचारासाठी दाखल झाले होते. उपचारानंतर अनेकांना घरी पाठवण्यात आले होते. यापैकी गंभीर परिस्थितीमुळे २२ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्या पैकी ९ रुग्णाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. २२ रुग्णांपैकी १५ रुग्णाला उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. तर ७ रुग्णाला सायंकाळपर्यत घरी पाठवण्यात येणार आहे. विषबाधा झाल्यानंतर वरिष्ठ आधिकाऱ्यासह तज्ज्ञ डॉक्टरचा चमु ठाण मांडुन होता.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
चकलीच्या खव्यातुन विषबाधा झाल्याचा अंदाज
लग्नातील जेवनात गोड पदार्थ म्हणून ठेवण्यात आलेल्या चकलीसाठी वापरण्यात येणाऱ्या खव्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. लातुर येथील प्रयोगशाळेत खवा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तपासणी अवाहल येण्यास दोन दिवस लागणार आहेत. अहवाल मिळाल्यानंतरच खरे कारण कळणार आहे.
Edited - Ganesh Pitekar