esakal | 'आठवड्याला एक कोटी लोकांना लस देणार'
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

'आठवड्याला एक कोटी लोकांना लस देणार'

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

लातूर: सध्या राज्यात आठवड्याला चाळीस लाख लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत मागील काळात अनेक वादविवाद झाले तरी लस उपलब्ध होईल. आता जगातील विविध देशांनी तयार केलेल्यांना लसींनाही मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेग वाढणार आहे. यातूनच येत्या काळात आठवड्याला एक कोटी लोकांना लस देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत यांनी दिली.

श्री. देशमुख म्हणाले, 'कोरोनाला थोपवण्याचा एक भाग म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. ही लस रामबाण उपाय नसली तरी एक संरक्षक कवच (प्रोटेक्शन कव्हर) म्हणून पुढे येत आहे. अनेकांना लस घेऊनही कोरोनाची लागण झाली तरी संसर्गानंतर कोरोनाची तीव्रता कमी करण्याचे काम लसीमुळे होत आहे. या स्थितीत लोकांनी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून योग्य वर्तन ठेवले पाहिजे.' कोरोनाची दुसरी लाट अपेक्षेपेक्षा अधिकच अडचणीची आहे.

‘माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण तिने दुसऱ्याचं ऐकून धोका दिला’

कमी वयोगटातील संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गापेक्षा भीतीचे वातावरण अधिक आहे. यातूनच रेमेडिसिव्हीरचा तुटवडा जाणवत आहे. जिल्ह्यात या तुटवड्यावर मात करणाऱ्यासाठी आता थेट कोवीड रूग्णालयांनाच औषधींचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रेमडेसिव्हीरच्या वापराबाबत आचारसंहिता निश्चित करण्यात आली असून गरज असतानाच त्याचा वापर करण्याची आमची सूचना डॉक्टरांनी मान्य केली आहे. सरकारकडून मिळणारे अर्थसाह्य रूग्णसंख्येच्या तुलनेत देण्याची महानगरपालिकेची मागणीही मान्य करण्यात आल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

खासगी रूग्णालयांत सुविधा जिल्ह्यात बेड व ऑक्सीजनची पुरेशी व्यवस्था आहे. वाढीव व्यवस्था म्हणून शहरातील खासगी रूग्णालयांत उपचाराची सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी सर्व वैद्यकीय घटकांचे साह्य घेऊन कोवीड व नॉन कोविड रूग्णालये निश्चित करण्यात येणार आहे. त्याची यादीही आयएमए संघटना निश्चित करण्यात येणार आहे. एका रूग्णालयाने किमान पाच बेड उपलब्ध केले तरी हजार बेड उपलब्ध होतील. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आणखी १२० बेड उपलब्ध करण्यात आले असून ते गुरुवार पासून (ता. १५) रूग्णांसाठी उपलब्ध होतील, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.