
तालुक्यात सततच्या पाऊसामुळे खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबीन पाण्यात गेले होते
जळकोट (लातूर): तालुक्यात जून ते आक्टोबर महिन्यांत अतिवृष्टी पुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता शेतकऱ्यांना दुसरा हप्प्ता सात कोटी १९ लाख रुपयाचा निधी तहसिल कार्यालयात जमा झाला असून लवकरच विविध बँकेत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
तालुक्यात सततच्या पाऊसामुळे खरिप हंगामातील मुग, उडीद, सोयाबीन पाण्यात गेले होते. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. यापूर्वी तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यात शासनाकडून सात कोटी रूपयांची मदत झाली होती. राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी सात कोटी एकोनिस लाख रुपयांचा दुसरा हप्ता तहसिल कार्यालयात जमा झाला आहे.
'औसा - नांदेड ते वारंगाफाटा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरु'
दरम्यान महसूल, कृषि विभागाला राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. वरील दोन्ही विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवून दिला होता. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना खरिप पिकांना प्रति हेक्टर दहा हजार रुपयांची तर बहुवार्षिक पिकांना प्रती हेक्टर पंचवीस हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा करण्यात येणार असल्याची माहिती, तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.
कोल्हापूरचे सीईओ अमन मित्तल लातूर महापालिकेचे नवे आयुक्त, देविदास टेकाळेंची बदली
तहसिल कार्यालयात सात कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांच्या याद्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. शुक्रवारपर्यंत तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.-संदीप कुलकर्णी तहसीलदार जळकोट.
(edited by- pramod sarawale)