मनमानी कारभारामुळे भाजप सदस्य नाराज; चाकूर पंचायत समितीत उपसले अविश्वास ठरावाचे अस्त्र

प्रशांत शेट्टे 
Monday, 8 February 2021

सभापती व उपसभापती इतर सदस्यांना विश्वात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आहे.

चाकूर (जि.लातूर) : भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीविरूध्द भाजपच्याच सहा सदस्यांनी सोमवारी (ता.आठ) जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. पंचायत समितीमध्ये भाजपचे आठ व दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. दीड वर्षांपूर्वी सभापतीपदी जमुना बडे व उपसभापतीपदी सज्जन लोणावळे यांची निवड करण्यात आली आहे.

पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल 

या काळात सभापती व उपसभापती इतर सदस्यांना विश्वात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलविण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर पंचायत समिती सदस्य महेश वत्ते, सरिता मठपती, सुनिता डावरे, विद्याताई शिंदे, उमादेवी राजेमाने, वसंत डिगोळे यांच्या स्वाक्षरी आहेत.

मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'

चार दिवसांपूर्वीच सभापती व उपसभापतीच्या पुढाकारातून तीन वर्षांपासून रखडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यु पवार यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर लागलीच भाजपच्याच सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. 

मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur News BJP Members Not Motion Against Chakur Panchayat Samiti President, Vice President