लातूरमध्ये अडीच महिन्यात फक्त २८ दिवस पाऊस

हरी तुगावकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जिल्ह्यात एक महिन्याच्या विश्रांती नंतर गुरुवारी रात्री सर्वच ५३ महसूल
मंडळात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. पाऊसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

लातूर - लातूर जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला
सुरवात झाली होती. पण नंतर मात्र चांगलीच उघडीप दिली. जूनपासून ते
आतापर्यंत गेल्या अडीच महिन्यात सरासरी केवळ २८ दिवस पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात एक महिन्याच्या विश्रांती नंतर गुरुवारी रात्री सर्वच ५३ महसूल
मंडळात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. पाऊसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. आजच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले असले तरी उत्पादनात घट होण्याची भिती आहे.

पावसाळ्याचे अडीच महिने संपले आहेत. या अडीच महिन्यात केवळ सरासरी २८ दिवसच पावसाने हजेरी लावली आहे. त्यात लातूर तालुक्यात १९, औसा २२, रेणापूर २३, अहमदपूर २४, चाकूर २३, उदगीर २४, जळकोट २४, निलंगा २६, देवणी २१, शिरुर अनंतपाळ २२ दिवस पावसाने हजेरी लावली आहे. त्यात गुरुवारी रात्री जिल्ह्यात सरासरी २५.४४ मिलीमीटर पाऊस झाला.  आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८२.८१ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात महसूल मंडळनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे आहे. लातूर २२, कासारखेडा सात, गातेगाव २१, तांदूळजा २९, मुरुड ५७, बाभळगाव १५, हरंगुळ २४, चिंचोली १९, औसा २५, लामजना ३७, किल्लारी ३६, मातोळा १८, भादा ३७, किनिथोट २०, बेलकुंड २९, रेणापूर २२, पोहरेगाव ३२, कारेपूर १४, पानगाव ३३, उदगीर २४, मोघा १६, हेर नऊ, देवर्जन ती, वाढवणा ३८, नळगीर ५२, नागलगाव ४०, अहमदपूर ३१, किनगाव १७, खंडाळी २९, शिरुर ताजबंद २३, हाडोळती ३१, अंधोरी २८, चाकूर १५, वडवळ नागनाथ १३, नळेगाव १०, झरी सहा, शेळगाव २४, जळकोट ५०, घोणसी ६२, निलंगा २९, अंबुलगा १२, कासारशिरसी ५१, मदनसुरी ४१, औराद शहाजनी १७, कासारबालकुंदा ३२, निटूर १४, पानचिंचोली १०, देवणी १७, वलांडी १५, बोरोळ २०, शिरुर अनंतपाळ १०, हिसामाबाद १३, साकोळ मंडळात ११ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तसेच गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात झालेला तालुकानिहाय पाऊस पुढील प्रमाणे आहे.

कंसात आतापर्यंत झालेल्या पावसाचे आहेत. लातूर २४.२५ (३००.३१), औसा २८.८६ (३१९.८५), रेणापूर २५.२५ (३५२), अहमदपूर २६.०५ (३६९.८६), चाकूर १३.६० (४९०.६०), उदगीर २६  (३४९.७३), जळकोट ५६ (३३५), निलंगा २५.७५ (४०१.१०), देवणी १७.३३ (४२१.६८), शिरुर अनंतपाळ ११.३३ (४८७.९९) मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तर उत्पादनावर मात्र परिणाम होणार आहे.
 

Web Title: In Latur only twenty eight days rain in the two and half month