esakal | गप्पागोष्टी पडल्या महागात, पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी केले चार पोलिसांना निलंबित
sakal

बोलून बातमी शोधा

4Police_3

लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसवण्यासोबतच जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न नुतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सुरु केला आहे.

गप्पागोष्टी पडल्या महागात, पोलिस अधीक्षक पिंगळे यांनी केले चार पोलिसांना निलंबित

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यावर आळा बसवण्यासोबतच जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न नुतन पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सुरु केला आहे. यात त्यांनी गातेगाव पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी तेथे महिला कक्षात गप्पागोष्टी, मनोरंजन करताना पोलिस त्यांच्या निदर्शनास आले. या चारही पोलिसांनी श्री. पिंगळे यांनी निलंबित केले आहे. श्री. पिंगळे यांची शिस्त पाहता पोलिस दलातच खळबळ उडाली आहे.

बीड कारागृह अधीक्षक संजय कांबळेंची कोरोनाशी झुंज अपयशी!


जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणून गेल्या महिन्यात श्री. पिंगळे येथे रुजू झाले. त्यांना येवून एक महिनाही झालेला नाही. आल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या विरोधात एक मोहिम उघडली आहे. मटका, जुगार, अवैध दारू अशा ठिकाणी सातत्याने छापे टाकले जात आहेत. एका मटका बुकीची त्यांनी केलेली चौकशी आजही जिल्हा पोलिस दलात चर्चेचा विषय आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या अधिकाऱयाना त्यांनी कामाला लावले आहे. इतकेच नव्हे तर विशेष पथकाच्या माध्यमातून छापे टाकणेही सुरु केले आहे.


तीन दिवसापूर्वी श्री. पिंगळे यांनी गातेगाव पोलिस ठाण्याला अचानक भेट दिली. त्यावेळी पोलिस हवालदार सुरेश जाधव, व्यंकटेश सिरसे, बाबुराव डाबकर, नागनाथ बोईनवाड हे चार पोलिस कर्मचारी महिला कक्षात गप्पोगोष्टी व मनोरंजन करताना त्यांना दिसले. कोरोनाच्या संदर्भातील उपाय योजनेचा एक भाग असलेल्या मास्कही त्यांच्या चेहऱयावर नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचेही त्यांनी उल्लंघन केल्याचे दिसून आले. यावेळी श्री. पिंगळे यांनी या चारही पोलिस कर्मचाऱयांची चांगलीच कानउघाडणी केली. ऐवढ्यावरच श्री. पिंगळे हे थांबले नाहीत. त्यांनी या चारही कर्मचाऱय़ांना निलंबित केले आहे. गेल्या काही दिवसापासून काम चुकारपणा करणाऱया काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱयांनाही नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे श्री. पिंगळे यांच्या शिस्तीमुळे अधिकारी व कर्मचाऱय़ांचेही धाबे दणाणले आहेत.

अधिकाऱ्यांमध्ये बदल्याची भिती

पोलिस अधिक्षक पिंगळे यांनी कामाला सुरवात केली आहे. त्यात पहिल्यांदा त्यांनी जे गणवेश न घालणाऱ्या पोलिसांनी पहिल्यांदा गणवेश घालण्य़ाच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत गणवेश न घालणारे पोलिसही गणवेशात दिसू लागले आहेत. विशेष पथकाने छापा टाकल्यानंतर अधिकाऱ्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. काम न करणाऱया पोलिस अधिकाऱ्यांना आता पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली जाईल की काय अशी भितीही वाटू लागली आहे.


संपादन - गणेश पिटेकर