बीड कारागृह अधीक्षक संजय कांबळेंची कोरोनाशी झुंज अपयशी!

दत्ता देशमुख
Wednesday, 4 November 2020

कोरोनाची लागण झाल्यानंतर संजय कांबळे यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 

बीड : येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांचे बुधवारी (ता. चार) पहाटे कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला जिवंत पकडल्यानंतर त्याला तुरुंगात ठेवल्यानंतर फाशी होईपर्यंत त्याच्या सुरक्षेची जबाबदारी लिलया पेलणाऱ्या संजय कांबळेंची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना विषाणूचा फैलाव जिल्ह्यात सुरु झाल्यानंतर जिल्हा कारागृहातील काही कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडून कैद्यांची संख्या कमी करण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात कारागृहातील ५० हून अधिक कैद्यांना एकाच दिवशी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. अधून मधून हा आकडा कमी अधिक होई.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, संजय कांबळे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 
चाळीशीतील अधिकारी असलेले संजय कांबळे मुंबईत नेमणूकीवर असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी अजमल कसाब याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. बीडमध्ये कारागृहाच्या सुरक्षेसह त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांत पुढाकार घेतला होता. त्यांच्या सुस्वभावामुळे जिल्ह्यात त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने वाढला होता.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Prison Superintendent Sanjay Kamble death by corona