'स्वबळावर लढून दाखवा' शिवसेनेचे काँग्रेसला आव्हान

congress vs shivsena
congress vs shivsena

जळकोट (जि.लातूर): नगरपंचायत निवडणूक संर्दभात काँग्रेस पक्षाकडून २३ तारखेला काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षांनी संवाद बैठक घेऊन, 'नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवा' असे आदेश पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच शिवसेनेने एक पञक काढून स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावे आम्ही पाहून घेऊ असे आव्हान दिले आहे.

जळकोट नगरपंचायतीचा पाच वर्षांच्या कार्यकाल संपला असून काही दिवसात नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे काॅग्रेस, राष्टवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, एम.आय.एम, प्रहार संघटना पक्षांकडून गेल्या पंधरा दिवसांपासून बैठकींची सत्रे सुरु आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस व राष्टवादी हे नगरपंचायत निवडणुकीत वेगवेगळे लढले होते. त्यामुळे या दोघांच्या मताची विभागणी होऊन भाजपच्या हातात सत्ता गेली होती.

आता काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेस एकत्र लढून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते यासाठी तयारीही करत आहेत. परंतू २४ तारखेला काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाचे जबाबदार पदाधिकारी यांनी एकला चलो रे, अशी भूमिका मांडल्याने नगरपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष काय भूमिका घेणार हे कळणे अवघड झाले आहे.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आहे. तसेच होनारी नगरपंचायत निवडणूक तीन्ही पक्षांनी एकत्रीत लढावी अशी इच्छा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची असल्याचे दिसत आहे.

दरम्यान जळकोट नगरपंचायतीत मागील निवडणुकीत शिवसेनेचे एक, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, भाजपाचे दहा, एम आय एम एक, अपक्ष एक असे पक्षीय बलाबल होते. नगरपंचायत निवडणुकीत भाजप हे स्वबळावर लढणार हे निश्चित झाले असून काॅग्रेस, राष्टवादी, काँग्रेस, शिवसेना हे तिन पक्ष एकञ लढण्याच्या तयारीत दिसून येत नसल्याचे त्यांच्या बैठकीतून बोलत असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेचे पक्ष निरीक्षक जितेंद्र देहांडे यांनी स्वबळाचा नारा देऊन सहयोगी पक्षाचा  चिमटा काढल्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले यांनी एक  पत्रक काढून काॅग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावे असे काँग्रेस पक्षाला उघडउघड आव्हान दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जळकोट नंगपंचायतीच्या निवडणूकीत कसा रंग भरणार हे येणारा काळ ठरवेल.

राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्टवादी काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे खालील निवडणुकीत तीनही पक्षाला समान जागा देऊन तिघांनीही एकत्र निवडणूक लढवून भाजपाला सत्तेपासून दुर ठेवता येतं. तीनही पक्ष वेगवेगळे लढल्यास मतांची विभागनी होऊन भाजपला याचा फायदा होणार. आम्ही पक्षाचे आदेश आल्यानंतर त्यांचे पालन करुन निर्णय घेऊ

-संगम टाले तालुकाप्रमुख जळकोट
 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com