उदगीर तालुक्यामधील गावांच्या सरपंच, उपसरपंच निवडीला सुरुवात

युवराज धोतरे
Friday, 5 February 2021

गुरुवारी तालुक्यातील अकरा गावांत आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या निवडी पार पडल्या.

उदगीर (जि.लातूर) : तालुक्यातील पहिल्या टप्प्याच्या एकसष्ट गावच्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (ता.चार) सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील प्रतिष्ठेच्या कुमठा येथील सरपंचपदी वर्षा केंद्रे, नळगीरला अंजुशा  उगीले, दावनगावला ज्ञानेश्वर पाटील व हाळीच्या सरपंचपदी माया गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.

गुरुवारी तालुक्यातील अकरा गावांत आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत या निवडी पार पडल्या. कुमठा येथे उपसरपंचपदी ज्ञानेश्वर पाटील, नळगीरला शंकर किवंडे, दावनगावला नारायण कांबळे व हाळीच्या उपसरपंचपदी राजकुमार पाटील यांची निवड करण्यात आली आहे.उर्वरित गावचे निवड झालेले सरपंच, उपसरपंच खालील प्रमाणे; आरसनाळ सरपंच शशिकला मोरे, उपसरपंच मिनाक्षी मटके, गुरदाळ सरपंच वैजनाथ झूकलवाड,  उपसरपंच नंदकुमार पटणे, चिघळी सरपंच अकुश सोनकाबळे, उपसरपंच ओमप्रकाश पाटील, मल्लापुर सरपंच मीना आडे, उपसरपंच नाथाबाई पवार, शिरोळ जानापुर सरपंच संगीता काळगापुरे, उपसरपंच हरिश्चंद्र इदलकंटे, सुमठाणा सरपंच मनिषा किवंडे, उपसरपंच वंदना बिरादार, हंगरगा सरपंच कोडाबाई राठोड, उपसरपंच रेखाबाई गायकवाड यांची निवड झाली आहे.

या निवडीसाठी पीठासन अधिकारी म्हणून संतोष चोपडे, सुरेश धोके वेंकटेश दंडे, राहुल सूर्यवंशी, संजयकुमार पाटील, उत्तम केंद्रे, विजय आजने, सुधाकर दौंडकर, राघोबा घंटेवाड, बालाजी धमनसुरे, अनिल चव्हाण यांनी काम पाहिले. या सर्वांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Politics Sarpanch, Upsarpanch Election Starts Udgir