माजी सैनिकाकडून चुकून गोळी झाडल्याचे उघड; लातूर बसस्थानक गोळीबार प्रकरण

Firing
Firing

लातूर : येथील मुख्य बसस्थानकात शुक्रवारी रात्री एका बसमध्ये माजी सैनिकाकडून चुकून त्याच्या पिस्तूलातून गोळी झाडली गेल्याने हा माजी सैनिक जखमी झाल्याचे उघड झाले आहे. त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी या माजी सैनिकांच्या विरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी दिली.

पंढरपूर हदगाव ही बस येथील मुख्य बस स्थानकात मध्यरात्री आली यावेळी बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाकडून पिस्तूलमधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती .या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास केला असता या बसमध्ये अहमदपूर येथील रहिवासी माजी सैनिक बालाजी मुखेडे  यांच्या हातून चुकून पिस्टलमधील गोळी झाडली गेली. ती गोळी बसच्या खिडकीवर लागून परत मुखेडे यांच्या बोटाला लागून गेली. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी मुखेडे यांच्या विरोधात गांधी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुखेडे यांची पिस्टल व 13 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत अशी माहिती पोलिस उपअधिक्षक सांगळे यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com