लिंगायत समाजाला डावलता, हे घ्या आमचे राजीनामे

युवराज धोतरे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लिंगायत समाजाला डावलले जात असल्याने लातूर जिल्हा परिषदेतील लिंगायत समाजाच्या पाच सदस्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षाकडे शनिवारी (ता.15) सामूहिक राजीनामा सोपवला आहे.

उदगीर (जि. लातूर) : जिल्हा परिषदेमध्ये गेल्या तीन वर्षापासून सातत्याने लिंगायत समाजाला डावलले जात असल्याने लातूर जिल्हा परिषदेतील लिंगायत समाजाच्या पाच सदस्यांनी भाजपा जिल्हाध्यक्षाकडे शनिवारी (ता.15) सामूहिक राजीनामा सोपवला आहे.

नूतन जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की गेल्या अनेक दिवसापासून लिंगायत समाज भाजपचा पारंपरिक मतदार आहे. या समाजाच्या सदस्यांना जिल्हा परिषदेत सभापती निवडीत व विकास कामांमध्ये सातत्याने डावलले जात आहे.

लग्नाच्या तगाद्यामुळे पोलिसानं पिलं विष

कुठल्याही महत्वाच्या समितीवर संधी दिली जात नाही. यावेळी झालेल्या सभापती निवडीत जुन्या सभापतींना डावलून लिंगायत समाजाच्या एकाला सभापती पदावर संधी देण्याची मागणी केली होती. मात्र जुन्या एका सदस्यांना पुन्हा सभापती पदाची संधी देऊन लिंगायत समाजावर अन्याय करण्यात आला आहे.

टोपे साहेब, इतकी कुठं वाट पाहायला लावतात का राव

मराठवाड्यामध्ये लिंगायत समाजाचे मतदार भाजपच्या अनेक दिवसापासून पाठीशी असून लोकसभा मतदारसंघ, विधानसभा  मतदारसंघ व विधान परिषदेवर समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले नाही. सातत्याने लिंगायत समाजाला डावलण्याचे काम भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आमच्यावर लिंगायत समाजबांधवांचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देत असल्याचे पत्र जिल्हा परिषद सदस्य मिलिंद लातुरे, महेश पाटील, बस्वराज पाटील कौळखेडकर, विजया बिरादार, उषा रोडगे यानी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री कराड यांच्याकडे दिले आहे. अशी माहिती तोंडार जिल्हा परिषदेच्या सदस्या विजया बिरादार यांचे पती बसवराज बिरादार यांनी दिली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Zila Parishad Members Resigned Over Lingayat Samaj Issue