सर्वधर्म समभाव जगाने भारताकडुन शिकावा : दलाई लामा

योगेश पायघन
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

पीईएसच्या क्रीडांगणावर जागतिक बौद्ध धम्म परिषदेला दलाई लामा यांचे रविवारी (ता. 24) सकाळी नऊ वाजता आगमन झाले. त्यावेळी उपासकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन सजवण्यात आले होते. त्यातून गेट नंबर एक पासून व्यासपीठापर्यंत दलाई लामा यांना उपासकांनी शिस्तीत वंदन केले.

औरंगाबाद : "मी कधीही बौद्ध धम्म सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हणत नाही. प्रत्येक आजाराला जसे वेगवेगळे औषध असते. तसे ज्याला जो योग्य वाटेल त्या त्या धर्माचे पालन करावे. एकमेव भारत असा देश आहे तिथे विविध पंथ, धर्म, परंपरा एकत्र शांततेत नांदत आहे. सर्वधर्म समभाव आवश्यक असून इतर देशानेही त्याचा आदर्श घ्यावा" असे प्रसिद्ध धम्मगुरू दलाई लामा म्हणाले. पीईएस मैदानावर रविवारी दिलेल्या धमदेसनेवेळी ते बोलत होते.

पीईएसच्या क्रीडांगणावर जागतिक बौद्ध धम्म परिषदेला दलाई लामा यांचे रविवारी (ता. 24) सकाळी नऊ वाजता आगमन झाले. त्यावेळी उपासकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहन सजवण्यात आले होते. त्यातून गेट नंबर एक पासून व्यासपीठापर्यंत दलाई लामा यांना उपासकांनी शिस्तीत वंदन केले. यावेळी त्रिशरण, पंचशील पठण झाले. व्यासपीठावर पोहचल्यावर दलाई लामा यांच्यासह भिक्खू संघाने तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून धम्मादेसनेला सुरुवात केली.

उपासकांच्या शिस्तीची, नियोजनाचे कौतुक

प्रास्ताविक व आभार संयोजक डॉ हर्षदीप कांबळे यांनी मानत धम्म कार्याची माहिती दिली. दलाई लामा यांच्या सुमारे पाऊने दोन तास विविध भाषेतून केलेल्या धम्म देसनेचा हिंदीतून भाषांतर करण्यात आले. उन्हात जमलेल्या उपासकांच्या शिस्तीची, नियोजनबद्ध आयोजनाचे दलाई लामा यांनी कौतुक केले. त्यानंतर भिक्खू संघाने दलाई लामा यांना पेंटिंग भेट दिली तर संयोजकांकडून डॉ. अरविंद गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा : ज्ञानाचा उपासकच बुद्धाचा खरा पाईक : दलाई लामा

यावेळी अखिल भारतीय भिक्‍खू संघ व संयोजनाच्या वतीने संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर आणि संजय पवार यांनी दलाई लामा यांचे स्वागत केले.  श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा धम्मासिद्धी, बोधिपालो महाथेरो, रोजाना व्हेनिच कांबळे, कुलगुरु डॉ. येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

बुद्ध म्हणजे काय धर्म....

नागार्जुनाच्या श्लोकाने धम्मादेसनेला सुरुवात करून बुद्ध धम्म हा एक अभ्यास आहे. भारताने अहिंसा आणि करुणा तीन हजार वर्षांपूर्वी सांगितली.बुद्ध म्हणजे काय धर्म म्हणजे काय समजून घ्या. भारतात बुद्धाचा जन्म झाला. बुद्ध होण्यापूर्वी त्यांनी ज्ञानाचा शोध घेतला. बुद्ध झाल्यावर ज्ञानाची उपासना केली. अहिंसा आणि करुनेला रुजवले. महावीरही हे मानत होते. चार आर्यसत्य समजून घ्या. धर्माचा अर्थ घेणे त्यातून समजुन घ्या असे सांगत बुद्धांना केवळ शिक्षक म्हणून पहा आज वैज्ञानिक ही चिंतन करत आहे त्याला आपण समजले पाहिजे असे मतही दलाई लामा यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : ग्रामपंचायतींना एल ‘ईडी ’ चा शॉक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn the equality of the world from India ; Dalai Lama