पालकमंत्र्यांच्या शेतात बिबट्याचे ठसे : वन विभागाची पळापळ, ड्रोन वापरून शोधणार

सुशांत सांगवे
Sunday, 3 May 2020

लातूरपासून जवळच असलेल्या बाभळगावात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याच शेतात हे बिबटे आढळले आहेत. ही घटना समजताच वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी 2 पिंजरे लावले आहेत. शिवाय, ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे.

लातूर : लातूरपासून जवळच असलेल्या बाभळगावात काही शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याच शेतात हे बिबटे आढळले आहेत. ही घटना समजताच वन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी 2 पिंजरे लावले आहेत. शिवाय, ड्रोनचीही मदत घेतली जाणार आहे.

बाभळगावात बिबट्या दिसला आहे, असा दूरध्वनी रविवारी सकाळी सहा वाजता लातुर ग्रामीण पोलीस चौकीत आला. पोलिसांनी ताततीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनविभागालाही कळविण्यात आले. 20 जणांची टीम तातडीने बाभळगावात पोचली. त्यांना या भागात एका बाबट्याच्या पावलांचे ठसे आढळुन आले. त्यामुळे त्यांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी या भागात 2 पिंजरे लावले आहेत.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

वन परिमंडल अधिकारी एन. एस. पचरंडे आणि एम. वाय. पवार यांनी याबाबतची माहिती 'सकाळ'ला दिली. ते म्हणाले, पालकमंत्र्यांच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. या भागात ऊस आणि बांबू आहे. बिबट्या येथे लपलेला असू शकतो. त्यामुळे या भागात आम्ही दोन पिंजरे लावले आहेत. आणखी एक पिंजरा लवकरच लावला जाणार आहे. आम्ही सकाळपासून या भागात गस्त घालत आहोत. पण, अद्याप बिबट्या आढळला नाही. त्यामुळे आम्ही ड्रोनची मदत घेणार आहोत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Pug marks Found In Amit Deshmukh Farm Latur News