‘एसडीओं’ना समज द्या अन्यथा कामबंद करू

aandolan.jpg
aandolan.jpg


कंधार, (जि. नांदेड) ः ‘कोरोना’च्या पार्शवभूमीवर पंचायत समितीसमोर शासकीय कर्तव्य बजावत असताना दोन ग्रामसेवकांना विनाकारण उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप करून व या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून ग्रामसेवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून ‘एसडीओं’ना योग्य ती समज द्या, अन्यथा कामबंद करू, असा इशारा दिला आहे.

लॉक डाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पांगविण्यासाठी उपविभाय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार हातात काठी घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. मिळेल त्याला झोडपून काढले जाते. समोरचा माणूस शासकीय कर्मचारी आहे का? याची शहानिशा न करताच त्याच्यावर काठ्यांची बरसात केली जात आहे. कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अनेक पत्रकारांनाही आजपर्यंत काठीचा प्रसाद मिळालेला आहे. ‘आले साहेबांच्या मना तेथे कोणाचे चालेना’ या उक्ती प्रमाणे मार खाणारे मूग गिळून गप्प बसत आहेत.

 ग्रामसेवकांना अमानुषपणे मारहाण
बुधवारी तालुक्यातील दोन ग्रामसेवक कोरोना संबंधित ग्रामपंचायतस्तरावरील कर्मचाऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप करण्याच्या परवानगीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे स्वत:चे ओळखपत्र गळ्यात अडकवून जात असतांना उपविभागीय अधिकारी बोरगावकर यांनी रस्त्यावर अडवून ग्रामसेवकांना अमानुषपणे मारहाण केली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. ग्रामसेवक हे कोरोना यौध्दे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्लिचिंग पावडर गावात फवारणे, कोरोना योध्दे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वाटप करणे, गावातील बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या नोंदी घेणे, बाहेरगावी अडकलेल्या नागरिकांच्या नोंदी घेणे, गावात स्वच्छता राखणे, रोगाबाबत जनजागृती करणे, अँटी कोरोना कवच/ टॉस्क फोर्स स्थापन करून कर्तव्य बजावणे असे अनेक कामे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ते पार पाडतात.


कोरोनाचे काम बंद करावे लागेल असा इशारा
त्यांना वेळोवेळी मुख्यालयात वरिष्ठांच्या आदेशानुसार येणे-जाणे करावे लागते. कोरोना संसर्ग सुरू असल्याने आधीच त्यांच्या मनावर दडपण आहे. यातच कर्तव्य बजावत असताना चौकशी न करताच मारहाण करणे ही बाब कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. याची गंभीर दखल घेऊन बोरगावकर यांना योग्य ती समज द्यावी अन्यथा पुन्हा असे प्रकार घडल्यास आम्हास कोरोनाचे काम बंद करावे लागेल असा इशारा ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष गंगाधर कांबळे, श्रीधर विश्वासराव, गोपाळ टेकाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com