esakal | शाळा, महाविद्यालये सुरु करा : सामाजिक संघटनांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

colleges

शाळा, महाविद्यालये सुरु करा : सामाजिक संघटनांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची मागणी तालुक्यातील पालक,शिक्षक, प्राध्यापक, वकील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व जागरूक नागरिक यांच्यावतीने शासनाला करण्यात आली आहे.

यासंदर्भात स्थानिक प्रशासनामार्फत मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना यांना मंगळवारी (ता.१४) निवेदन सादर करण्यात आले . इयत्ता पहिली ते पदवी,पदव्युत्तर पर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

कालच अगदी आनंदाने विद्यार्थ्यांनी NEET प्रवेश परीक्षा दिली.यावरून शैक्षणिक कार्य पूर्ववत होऊ शकतं असे दिसत असलेतरी राज्यातील शाळा, महाविद्यालय सुरू करायचा निर्णय दिवसेंदिवस लांबणीवर पडत असल्याची खंत निवेदनात व्यक्त केली आहे.शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कुणाचेही लक्ष दिसत नाही.

हेही वाचा: कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

शिक्षण,आरोग्य खाते यांचा परस्पर ताळमेळ नाही. केवळ औपचारिक शिक्षण किंवा शैक्षणिक नुकसान म्हणून नव्हे तर एकूणच मुलांच्या सामाजिकीकरणासह मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासाचा विचार करता आता शाळा सुरू होणे ही अत्यावश्यक गरज बनली आहे. असे जगातील मानसशास्त्रज्ञसुध्दा सांगत आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस, आपल्या सर्वांचे सामाजिक,राजकिय व्यवहार पाहिले असता कुठेही कोरोनाने अडचण केली असं दिसतं नाही.मग शाळा न सुरु करण्याची धडपड कसं कुणीच करत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.जगात शाळा सुरु झाल्या आहेत. शासनाने काय करता येईल ते बघावं? पण शाळा सुरु झाल्याचं पाहिजेत. शाळा सुरु न करणे ही एक प्रकारची ज्ञानबंदी वाटत आहे. समाज मन सुदृढ होण्यासाठी शाळा सुरु होणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाईन शिक्षण याची वाताहात न सांगितलेली बरी. आपण साधं फोनवर एकमेकांना बोलू शकत नाहीत तर इंटरनेटवर शिकणे दुरापास्त आहे. कुठे रेंज प्रॉब्लेम, कुठे स्पिड प्रॉब्लेम. याचा काही मेळ बसत नाही. वेगवेगळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यम आपल्याला शाळा बंद ठेवणे किती गंभीर बाब असल्याचं निदर्शनास आणून देत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी

उपरोक्त प्रश्नी गंभीर दखल घेऊन पावलं उचलावी. वाडी वस्त्यांमध्ये, तांड्यावर मुलं, शहरातील गरीब मुलं शिक्षणाबाहेर आहेत. आपल्याला कल्पना असेलच या काळात खुप बालविवाह झालेत. शाळा सुरु झाल्यावरच अजून कळेल; शिक्षणात आज काय आपल्या हाती शिल्लक राहिलं आहे.

हेही वाचा: ऊस बिलाचे चेक बाऊन्स ; शेतकरी मानसिक तणावात

करिता शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांची आर्त हाक ऐकून शाळा नक्की सुरु कराव्यात, विनंती निवेदनाद्वारे करण्यात करण्यात आली. निवेदनावर शारीरिक शिक्षक संघटनेचे अनुप सोळंके,दिलीप चव्हाण,ज्ञानोपासकचे प्रा.पांडुरंग निळे,वकील संघाचे एड.मनोज सारडा,एड.माधव दाभाडे, मुख्याध्यापक,डॉ.प्रभाकर अंभुरे, शिवाजी खिस्ते, गोविंद लहाने, कापुरे एस.एम.,राहुल प्रधान, प्रा.सतीश इप्पर, प्रा.बाळू बुधवंत,गजानन वाघमार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image
go to top