हिंगोलीत पावसाच्या हलक्या सरी, दुपारपर्यंत सूर्यदर्शनच नाही!

हिंगोलीत पावसाच्या हलक्या सरी
hingoli rain news
hingoli rain newsrain

हिंगोली : हिंगोलीत सोमवारी (ता.सहा) भल्या पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्या नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली होती. तापमान ३९ अंशांवर होते. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. वातावरणात कमालीची उष्णता वाढली असल्याने उकाडा वाढला आहे. दरम्यान सोमवारी सकाळी पाच वाजता हिंगोली शहरासह तालुक्यातील अंधारवाडी, कारवाडी, पिंपरखेड, पिंपळखुटा आदी भागात दहा ते पंधरा मिनिटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. (Light Showers In Hingoli, No Sunlight Till Noon)

hingoli rain news
'पंतप्रधान मोदींचा फोटो वाईट पद्धतीने पाहण्याची वेळ भाजपाने आणलीय'

त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत हिंगोली शहरात सूर्यदर्शन झाले नव्हते. दरम्यानच्या कालावधीत उष्णता वाढली होती. ढगाळ वातावरण असून देखील तापमान ३९ अंशांवर होते. हवामान खात्याने पावसाचा (Rain) अंदाज व्यक्त केला आहे. बदलत्या वातावरणाने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी शेतात राहिलेली कामे सुरू केली आहेत.

hingoli rain news
तुम्हाला आमचे दुःख समजत नाही, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींवर टीका

शेतातील मशागत करणे, शेणखत पसरविणे, काडी कचरा वेचणे, वळण करणे, शेतात निघालेल्या झाडांच्या पालव्या तोडणे यासह खते, बियाणे, औषधी खरेदी करण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मृग नक्षत्रात पेरणी व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com